आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi High Court Refuses To Stay Vaccine Trial On Children, Seeks Reply From Center And DGCI On Petition

मुलांवरील व्हॅक्सिन ट्रायल:दिल्ली हायकोर्टाने मुलांवरील व्हॅक्सिन ट्रायल थांबवण्यास नकार दिला, याचिकेवर केंद्र व DGCIकडून उत्तर मागितले

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

2 ते 18 वर्षाच्या मुलांवर सुरू करण्यात येणाऱ्या कोव्हॅक्सिनच्या ट्रायल थांबवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी यावर सुनावणी करताना केंद्र सरकार, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) आणि लस कंपनी भारत बायोटेक यांना नोटीस बजावली असून, त्यांना 15 जुलैपर्यंत आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. तथापि, कोर्टाने सध्या ट्रायल थांबवण्यास नकार दिला आहे. सरन्यायाधीश डी.एन. पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली. संजीव कुमार नावाच्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली आहे. त्यांनी मुलांवरील ट्रायल थांबवण्याची मागणी केली आहे.

पुढील 10-12 दिवसांत चाचण्या सुरू होतील
यापूर्वी, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI)) मुलांवर कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांना मान्यता दिली होती. या चाचण्या येत्या 10-12 दिवसात सुरू होण्याची अपेक्षा आहे. कोव्हॅक्सिन सध्या देशात 18+ लसीकरणासाठी वापरला जात आहे.

दिल्ली, पटना आणि नागपूरमध्ये होणार ट्रायल
विषय तज्ज्ञ समितीने AIIMS दिल्ली, AIIMSपटना आणि मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूर येथे 525 मुलांच्या चाचणी घेण्यावर सहमती दर्शवली आहे. ट्रायल अंतर्गत 28 दिवसांच्या अंतरात दोन डोस दिले जाणार आहेत. ट्रायल यशस्वी झाल्यास अमेरिका आणि कॅनडानंतर कोरोनाची देशी लस भारतातही 2 ते 18 वर्षे वयोगटासाठी तयार होईल. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) च्या सहकार्याने भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन विकसित केले आहे.

बातम्या आणखी आहेत...