आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोविड-19:दिल्ली आयआयटीची स्वस्त कोरोना तपासणी किट आज लाँच होणार

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयआयटीने किटची कमाल किंमत 500 रुपये निश्चित केली आहे

दिल्ली आयआयटीने तयार केलेली स्वस्त कोरोना तपासणी किट बुधवारी व्यावसायिकदृष्ट्या लाँच होईल. दिल्ली आयआयटीचे संचालक व्ही. रामगोपाल राव यांच्या नुसार तिच्या मदतीने महिनाभरात कमी खर्चात २० लाखांपर्यंत तपासण्या करणे शक्य होईल. कोविड- १९ च्या तपासणीसाठी किट बनवणारी आयआयटी पहिली शैक्षणिक संस्था आहे. संस्थेने कमी किमतीच्या अटीवर व्यावसायिक उत्पादनासाठी कंपन्यांना त्याचा खुला परवाना दिला आहे. आयआयटीने त्याची कमाल किंमत ५०० रुपये प्रत्येक किटची निश्चित केली आहे.

मात्र, ‘काेराेश्याेर’ नावाने किटचे व्यावसायिक उत्पादन करणारी कंपनी न्यूटेक मेडिकल डिव्हायसेसने अद्याप किमतीचा खुलासा केलेला नाही. मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि राज्यमंत्री संजय धोत्रे किट लाँच करतील. आयआयटीच्या संचालकांनुसार, या किटमुळे कोरोनाची तपासणी कमी किमतीत आणि मोठ्या प्रमाणात होऊ शकते.