आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi In Crisis Again Due To Pollution | Environment Minister Gopal Rai Appealed For Work From Home | Marathi News

प्रदूषणामुळे दिल्ली पुन्हा संकटात:पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी वर्क फ्रॉम होमचे केले आवाहन

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. दरम्यान, दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी लोकांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नाही तर जे लोक ऑफिसला जात आहेत, त्यांनी कार किंवा बाईक शेअर करावी, असे आवाहनही त्यांनी केले. यामुळे कमी वाहने रस्त्यावर येतील.

गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीतील विविध भागात प्रदूषणाची पातळी वाढल्याचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सांगितले. केवळ दिल्लीतच नाही तर उत्तर प्रदेश, हरियाणामधील अनेक भागात AQI ची पातळी वाढली आहे. ते म्हणाले की, 1 नोव्हेंबर रोजी AQI पातळी फरीदाबादमध्ये 403, मानेसर 393, गुरुग्राम 390, बहादुरगड 400, सोनीपत 350, कैथल 350, ग्रेटर नोएडा 402, नोएडा 398, गाझियाबाद 381 होती.

भाजपने CAQMचा आदेश पाळला नाही : गोपाल राय
गोपाल राय यांनी सांगितले की, काल दिल्लीत अँटीडस्ट मोहिमेअंतर्गत तपासणी करण्यात आली होती. यावेळी एल अँड टीच्या जागेवर छुप्या पद्धतीने काम सुरू असल्याचे आढळून आले. माती उघड्यावर पडली होती. स्मॉग विरोधी बंदूक नव्हती. नंतर कळले की तेथे भाजपचे कार्यालय होत आहे. भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले की, भाजपने सीएक्यूएमचा आदेश पाळला नाही. फटाक्यांचे प्रदूषण वाढवण्यावर भाजपचा भर आहे.

त्यांनी लोकांना आवाहन आहे की, कुठेही बांधकाम करताना दिसल्यास त्याचा फोटो काढून ग्रीन अॅपवर पाठवा. काल भाजप कार्यालयात बांधकाम चालू होते, कदाचित भाजपचे इतरत्रही अशीच बांधकामे सुरू आहेत. कोळसा किंवा लाकूड वापरू नका. बायोमास जाळल्याने प्रदूषण होते. सोसायटी आणि आरडब्ल्यूए सुरक्षा रक्षकांना इलेक्ट्रिक हिटर प्रदान करा जेणेकरून ते थंडीपासून वाचण्यासाठी उघड्यावर आग लावणार नाहीत.

दिल्ली-एनसीआरमध्ये वातावरण खराब
दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरातील हवामानाची स्थिती खराब आहे. SAFAR इंडिया एअर क्वालिटी सेवेनुसार, राजधानीचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) बुधवारी 373 नोंदला गेला, जो अत्यंत खराब श्रेणीत येतो. एनसीआरबद्दल बोलायचे तर दिल्लीपेक्षाही वाईट स्थिती आहे. SAFAR नुसार, नोएडाt बुधवारी AQI 428 नोंदवला, जो गंभीर श्रेणीत येतो. याशिवाय गुरुग्राममध्ये 364 आणि CPCB नुसार, गाझियाबादचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 342 वर नोंदवला गेला.

बातम्या आणखी आहेत...