आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील ग्राहक न्यायालयाने लक्झरी हॉटेल चेन ITC ला एका महिलेला 2 कोटी रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाचे म्हणणे आहे की, आयटीसी मौर्य हॉटेलने आशना रॉय नावाच्या या महिलेचे लांब केस कापले आणि केसांवर चुकीची ट्रीटमेंट दिली, ज्यामुळे महिलेचे मोठे नुकसान झाले. तिची जीवनशैली बदलली आणि तिचे अव्वल मॉडेल बनण्याचे स्वप्न भंगले. ही बाब एप्रिल 2018 ची आहे, ज्यावर न्यायालयाने 21 सप्टेंबर रोजी आपला निर्णय दिला आहे.
ग्राहक न्यायालयाच्या खंडपीठाचे अध्यक्ष आर.के. अग्रवाल आणि सदस्य एस.एम. कांतीकर यांनी महिलेला ही नुकसान भरपाई देण्यास मदत केली. ते म्हणाले की महिलांना त्यांच्या केसांची खूप काळजी असते, केस सुंदर ठेवण्यासाठी त्या पैसे खर्च करतात आणि याच्याशी त्यांच्या भावना जुळलेल्या असतात.
हेयर प्रोडक्ट्सची मॉडल होती महिला
न्यायालयाने म्हटले की, आशना रॉय तिच्या लांब केसांमुळे हेअर प्रोडक्ट्ससाठी मॉडेलिंग करत असे. तिने अनेक मोठ्या ब्रॅण्ड्ससाठी मॉडेलिंग केले होते, पण हॉटेलने तिच्या सूचनांविरूद्ध तिचे केस कापले, त्यामुळे तिला अनेक मोठ्या असाइनमेंट सोडाव्या लागल्या आणि तिला खूप त्रास सहन करावा लागला. तिला मानसिक आघात झाला आणि तिने नोकरी देखील गमावली.
हॉटेलने केला होता चूक लपवण्याचा प्रयत्न
हॉटेलवर केवळ महिलेचे केस कापण्याचाच नव्हे तर हेअर ट्रीटमेंटमध्ये मेडिकल निष्काळजीपणा करण्याचा आरोपही आहे. न्यायालयाने सांगितले की, महिलेची टाळू जळाली आहे, ज्यामुळे महिलेला अजूनही अॅलर्जी आणि खाज आहे. महिलेने दाखल केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटवरून हे स्पष्ट झाले की हॉटेलने आपली चूक मान्य केली होती आणि मोफत उपचार देऊन आपली चूक झाकण्याचा प्रयत्न केला होता. ही भरपाई देण्यासाठी कोर्टाने हॉटेलला 8 आठवडे दिले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.