आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi Jails Raid Update; Mandoli Jail Officers Suspended | Mobile Phones Seized | Delhi News

दिल्लीतील सर्व जेलमध्ये छापेमारी:गेल्या 15 दिवसांत 117 मोबाईल जप्त, मंडोली कारागृहातील 5 अधिकारी निलंबित

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील तिहार, रोहिणी आणि मंडोली कारागृहात आज छापे टाकण्यात आले. यावेळी 117 मोबाईल जप्त करण्यात आले. यानंतर कारागृह विभागाने मंडोली कारागृहातील पाच अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. कारागृहात असे प्रकार आढळून आल्यास केवळ कैदीच नाही तर संबंधित तुरुंग अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असे जेलचे डीजी संजय बेनिवाल यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

उपअधीक्षक प्रदीप शर्मा, उपअधीक्षक धर्मेंद्र मौर्य, सहायक अधीक्षक सनी चंद्रा, हेड वॉर्डर लोकेश धामा हेड वॉर्डर आणि वॉर्डर हंसराज मीना अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

शोध मोहीम सुरूच राहणार
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 15 दिवसांपासून सर्व तुरुंगांमध्ये शोधमोहीम सुरू आहे. यावेळी कारागृह कर्मचाऱ्यांकडून 117 मोबाईल जप्त करण्यात आले. याशिवाय चाकू, पेन ड्राइव्ह आणि काही चाव्याही सापडल्या आहेत. महासंचालक संजय बेनिवाल यांनी सर्व तुरुंग अधीक्षकांना त्यांच्या कारागृहात मोबाईल फोन आणि इतर प्रतिबंधित वस्तू शोधण्यासाठी शोध पथके तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

कारागृहातील बंदी असलेल्या वस्तूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी यापुढेही शोधमोहीम सुरू ठेवण्याच्या सूचना कारागृह महासंचालकांनी दिल्याचे तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले.

18 डिसेंबरच्या रात्रीही छापा
याआधीही डीजी बेनिवाल यांनी तुरुंग मुख्यालयात विशेष दक्षता पथक स्थापन केले होते. 18 डिसेंबर 2022 रोजी या पथकाने तामिळनाडू विशेष पोलिस दलासह मंडोली जेलवर छापा टाकला. यावेळी आठ मोबाईल आणि आठ चाकू जप्त करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...