आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi JNU University Controversy, Anti Brahmin Baniyas Slogans I JNU Campus | Delhi JNU Latest News  

JNUच्या भिंतीवर लिहले-'ब्राम्हणों भारत छोडो':बनियांविरोधातही लिहिले नारे; ABVP-AISP या विद्यार्थी संघटनांत आरोप-प्रत्यारोप

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जवाहरलाल नॅशनल युनिव्हर्सिटी (JNU) कॅम्पसच्या भिंतींवर ब्राह्मण आणि बनियांच्या विरोधातील नारे लिहिलेले आढळून आले आहेत. स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजच्या भिंतींवर लाल रंग लावून ब्राह्मणांनी भारत सोडा, ब्राम्हण- बनियांनो, आम्ही तुमच्यासाठी येत आहोत, तुम्हाला सोडले जाणार नाही; पुन्हा शाखेत जा...धमक्या लिहिल्या आहेत.

नोव्हेंबर 2019 साली डाव्यांनी तीन दिवस नजरकैदेत ठेवलेल्या JNU च्या महिला प्राध्यापिकेच्या केबिनच्या दारावर 'शाखा लौट जाओ' असे देखील लिहलेले आढळून आले आहे. या घटनेबाबत जेएनयू प्रशासनाकडून अद्याप कोणतेही माहिती देण्यात आलेली नाही.

ABVP आणि AISA यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले

  • अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) या घोषणांवरून अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या (AISA) कम्युनिस्ट विद्यार्थ्यांवर निशाणा साधला आहे. ABVP म्हणते की डाव्या विचारसरणीच्या प्राध्यापकांना धमकावण्यासाठी त्यांच्या चेंबरवर धमक्या लिहिल्या आहेत. आरोपींवर कारवाई करावी, अशी मागणी अभाविपने जेएनयू प्रशासनाकडे केली आहे.
  • त्याचवेळी, AISA संघटनेचे सदस्य आणि जेएनयूचे माजी अध्यक्ष एन. साई. बालाजी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, ABVP काय बोलत आहे, हे आम्हाला माहीत नाही. आम्ही असे कोणतेही काम केलेले नाही. हे विद्यार्थी परिषदेनेचे केले असावे, असा उलटवार त्यांनी केला.

फोटोंमध्ये पाहा जेएनयूमधील भींतीवर कोणत्या प्रकारच्या घोषणा लिहिल्या आहेत

बातम्या आणखी आहेत...