आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi JNU University Controversy, Anti Brahmin Baniyas Slogans I Delhi JNU Latest News   

JNUमध्ये आता डाव्यांविरोधात घोषणा:हिंदू रक्षक दलाने भिंतीवर लिहिले- 'कम्युनिस्टांनो भारत सोडा'

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू रक्षक दलाने दिल्लीतील जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय विद्यापीठाच्या (JNU) मुख्य गेटवर 'कम्युनिस्ट भारत छोडो' अशा घोषणा लिहिल्या आहेत. तर त्यांनी कम्युनिस्टांची म्हणजे डाव्या विचारसरणीच्या लोकांची तुलना थेट ISIS या दहशतवादी संघटनेशीही केली आहे.

दरम्यान, कम्युनिस्ट पक्षाच्या अध्यक्षा पिंकी चौधरी यांनी अशा प्रकारला विरोध केला आहे. त्या म्हणाल्या की, आमच्या विरोधात अशाप्रकारे घोषणा देणारे अज्ञातवासात गेले आहेत. मात्र, आम्ही अजूनही ठाम आहोत. ज्यांच्यात हिंमत असेल त्यांनी आमच्याशी येवून बोलावे. अशाप्रकारे विरोध करून काहीही होणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

30 सप्टेंबरला भींतींवर ब्राम्हणांविरोधात घोषणा

साधारण तीन ते चार दिवसांपूर्वीच म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या भिंतींवर लाल रंगात घोषणा लिहिल्या होत्या की, ब्राह्मणांनी भारत सोडावा, ब्राह्मण-बनियांनो, आम्ही तुमच्यासाठी येत आहोत, तुम्हाला सोडले जाणार नाही; शाखेत परत जा. अशा धमकीच्या घोषणा देण्यात आलेल्या होत्या. मात्र, तेव्हा हे कोणी केले अजूनही समोर आलेले नाही. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बातम्या आणखी आहेत...