आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांनी 2 वर्षांच्या मुलाला छतावरून फेकले:स्वत: तिसर्‍या मजल्यावरून मारली उडी, दोघांचीही प्रकृती चिंताजनक

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीत दारूच्या नशेत एका व्यक्तीचे पत्नीसोबत भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात त्याने आपल्या 2 वर्षांच्या मुलाला पहिल्या मजल्यावरून खाली फेकून दिले. यानंतर त्याने स्वतः तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. सध्या दोघेही एम्समध्ये दाखल असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

दोन वर्षांपासून वेगळी राहते पत्नी

कालकाजी परिसरात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. मान सिंह असे आरोपीचे नाव असून तो 30 वर्षांचा आहे. पत्नी पूजाने सांगितले की, पतीसोबत वाद झाल्यानंतर ती तिच्या 2 वर्षांच्या मुलासोबत आजीच्या घरी राहते. शुक्रवारी रात्री मान दारूच्या नशेत तेथे आला आणि आवाज करू लागला. पूजाने विरोध केल्यावर मानने मुलाला पहिल्या मजल्यावरून खाली फेकून दिले.

आरोपीने आपल्या मुलाला या इमारतीच्या गच्चीवरून खाली फेकले.
आरोपीने आपल्या मुलाला या इमारतीच्या गच्चीवरून खाली फेकले.

यानंतर मानसिंहने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. घटनास्थळी उपस्थित लोकांनी बाळाला खासगी रुग्णालयात, तर मान सिंह यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींनी मुलाला 21 फूट उंचीवरून फेकले. पत्नीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...