आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीच्या कंझावाला दुर्घटनेप्रकरणी आणखी 2 व्हिडिओ व एक छायाचित्र उजेडात आले आहे. यातील एका व्हिडिओत एक मुलगा स्कूटी चालवताना दिसून येत असून, त्याच्या मागे निधी व अंजली बसल्या आहेत. हा मुलगा त्यांना गल्लीच्या बाहेर सोडतो. अंजलीच्या हातात मोबाइल आहे. ती काहीवेळ या मुलाशी गप्पाही मारते.
दुसऱ्या व्हिडिओत अंजली व निधी गल्लीबाहेर जाताना दिसून येत आहेत. पण आता त्यांच्यासोबत तो मुलगा दिसत नाही. अंजली व निधी एकत्र जाताना दिसून येत आहेत. निधी मागे बसली आहे. तर अंजली स्कूटी चालवत आहे.
अन्य एका छायाचित्रात अपघातानंतर आशुतोष आरोपीशी चर्चा करताना दिसून येत आहे. हे सीसीटीव्ही फुटेजमधून घेण्यात आलेले छायाचित्र आहे. त्यात 1 जानेवारी अशी तारीख दिसून येत आहे.
दुसरीकडे,पोलिसांनी अंजलीला तब्बल 12 किलोमीटर फरफटत नेणाऱ्या कारमध्ये 5 नव्हे 4 आरोपी असल्याचा दावा केला आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, दीपक नामक आरोपी घरीच होता. पण त्याने अपघातावेळी आपण स्वतः कार चालवत सांगून पोलिसांची दिशाभूल केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, कार चालवणाऱ्या आरोपीचे नाव अमित आहे. त्याच्याकडे चालक परवाणा नाही. त्याने अंजलीला कारने उडवले. त्यानंतर आपला मित्र दीपकला घटनेची संपूर्ण माहिती दिली. परवाना नसल्याची गोष्ट ऐकताच दीपकने अमितचा गुन्हा स्वतःच्या डोक्यावर घेतला. त्यानंतर त्याने पोलिसांनाही अपघात झाला त्यावेळी आपण स्वतः कार चालवत असल्याचे सांगितले.
दुसरीकडे, दिल्ली पोलिस या घटनेची एकमेव प्रत्यक्षदर्शी निधीची चौकशी करत आहेत. यासाठी सकाळीच तिला तिच्या घरून पोलिस मुख्यालयात नेण्यात आले. पोलिसांनी कार मालक आशुतोषला अटक केली आहे. त्याच्यावर आरोपींची मदत केल्याचा आरोप आहे.
प्रश्न -अपघातात एकूण किती आरोपी होते?
कंझावाला अपघातात एकूण 7 आरोपी आहेत. कारमध्ये केवळ 4 जण होते. उर्वरित 3 जणांवर आरोपीला वाचवण्याचा व प्रकरणावर पडदा टाकण्याचा आरोप आहे. कारमध्ये असलेल्या आरोपींत मनोज मित्तल, अमित खन्ना, कृष्ण व मिथूनचा समावेश आहे. या आरोपींना दीपक खन्ना, अंकुश खन्ना व कारमालक आशुतोष या तिघांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. 6 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 7वा आरोपी अंकुश खन्ना याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी पत्रकार परिषदेत कोणते खुलासे केले?
पोलिसांनी 5 जानेवारी रोजी 3 मोठे खुलासे केले. एक -आरोपी 5 नव्हे 7 आहेत. दोन -आरोपींचा मृत तरुणी अंजली व प्रत्यक्षदर्शी निधी यांच्याशी जुनी ओळख नाही. तीन- कार चालवणाऱ्या तरुणाचे नाव अमित आहे. त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसेन्स नव्हते.
आरोपींना कारखाली मुलगी अडकल्याचे माहिती होते?
उत्तर -हो... आरोपींना मुलगी कारखाली अडकल्याचे माहिती होते. त्यानंतरही त्यांनी कार चालवली. पोलिसांनी हा दावा केला आहे. अपघात 31 डिसेंबर रोजी रात्री 2 वाजून 4 मिनिटांनी झाला. अंजलीचा मोबाइल अजून आढळला नाही. दिल्लीच्या रोहिणी कोर्टाने 5 आरोपींच्या पोलिस कोठडीत 4 दिवसांची वाढ केली आहे.
24 तासांत 4 आणखी व्हिडिओ उजेडात
31 डिसेंबर रोजी रात्रीचे आणखी 4 व्हिडिओ उजेडात आलेत. पोलिसांना या अपघाताचे एकूण 23 व्हिडिओ आढळल्याचाही दावा केला जात आहे. याच व्हिडिओच्या आधारावर आरोपींची चौकशी केली जात आहे.
आरोपींच्या कारनंतर काही वेळाने दिल्ली पोलिसांचे वाहनही त्याच मार्गाने जाताना दिसून येत आहे. याचेही सीसीटीव्ही फुटेज उजेडात आले आहे.
या घटनेशी संबंधित मोठे अपडेट्स
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.