आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील सर्वाधिक उंचावरील दिल्ली-लेह मार्गावर पुढील वर्षी मे महिन्यानंतर हिमाचल परिवहन महामंडळाची (HRTC) बस सुरू होण्याची शक्यता आहे. या सेवेसाठी सध्या केवळ बॉर्डर रोड ऑर्गेनाइजेशनची (BRO)मंजुरी मिळणे बाकी आहे. या मार्गावरील बस सेवा गत 15 सप्टेंबर रोजी बंद करण्यात आली होती. आता ती पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
विनाक्लियरेंस या मार्गावर बससेवा नाही
HRTC या मार्गाची स्थिती पाहून बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेते. हवामान खराब असल्याच्या स्थितीत या मार्गावरील चालक व वाहकांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आता बीआरओ परवानगीशिवाय बससेवा सुरू होणार नाही. या मार्गावर 2019 मध्ये बससेवा सुरू करण्यात आली होती.
1026 किमी अंतरासाठी लागतात 32 तास
दिल्ली-लेह हिमाचलमधील सर्वात लांब मार्ग आहे. हा जगातील सर्वाधिक उंचीवरीलही मार्ग आहे. HRTCची बस 1026 किमीचे अंतर जवळपास 32 तासांत कापते. अटल टनल तयार होण्यापूर्वी हे अंतर कापण्यासाठी 36 तासांहून अधिक वेळ लागत होता. पण आता हे अंतर 4 तास व 46 किमीने कमी झाले आहे.
बसचा विविध डोंगरदऱ्यांतून प्रवास
दिल्ली-मनाली-लेह मार्गावर धावणारी बस अटल बोगदा रोहतांग, बारालाचा दर्रा ((16020 फुट), नकी दर्रा (15552 फुट), लाचुंग दर्रा (16620), तंगलंग दर्रा (17480) मार्गे धावते. हा संपूर्ण प्रवास अत्यंत रोमांचकारी असतो. एक हजाराहून अधिक किमीचा प्रवास व उंच डोंगरदऱ्यांतून जाणाऱ्या या बस सेवेची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.
BRO च्या क्लियरेंसनंतरच धावेल बस - RM
HRTCचे प्रादेशिक परिवहन अधिकारी (RM) मंगल चंद मनेपा यांनी सांगितले की, दिल्ली-लेह मार्गावरील बस सेवा सध्या बंद आहे. ही सेवा पुढील वर्षी बीआरओची मंजुरी मिळाल्यानंतर पुन्हा सुरू होईल. ही मंजुरी मे महिन्यात मिळण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.