आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Delhi LG Anil Baijal Vs Arvind Kejriwal; Central Government Notifies The GNCTD(Amendment) Bill 2021

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीत नायब राज्यपालच बॉस:आता केजरीवाल सरकारला कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी घ्यावी लागेल नायब राज्यपाल अनिल बैजल यांची मंजुरी; दिल्लीत GNCTD कायदा लागू

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुठलाही निर्णय घेण्यासाठी घ्यावी लागेल नायब राज्यपालांची पूर्व परवानगी

दिल्लीत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला सरकार आणि राज्यपाल वादात आता नायब राज्यपालच बॉस असा कायदा लागू करण्यात आला आहे. मार्च महिन्यात संसदेने गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (दुरुस्ती) विधेयक 2021 मंजूर केले होते. GNCTD नावानेही ओळखल्या जाणारे हे विधेयक गृहमंत्रालयाच्या नोटिफिकेशननंतर 27 एप्रिलपासून लागू झाले आहे. या कायद्यानुसार, दिल्लीतील निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याकडेच अधिक अधिकार असणार आहेत.

काय आहे या कायद्याचा अर्थ?

  • हा कायदा लागू झाल्यानंतर आता दिल्लीत सरकारचा खरा अर्थ नायब राज्यपाल असे झाले आहे.
  • दिल्लीत निवडून आलेल्या सरकारच्या तुलनेत नायबस राज्यपाल अनिल बैजल यांना जास्त अधिकार राहणार आहेत.
  • कुठलाही निर्णय घेण्यासाठी दिल्ली सरकारला नायब राज्यपालांची पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे.
  • सरकारला वैधानिक निर्णय घेण्यासाठी 15 दिवसांपूर्वी नायब राज्यपालांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
  • प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी 7 दिवसांपूर्वी नायब राज्यपालांची मंजुरी घेणे आता आवश्यक राहील.

असा अमलात आला कायदा
NCT विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर ते मंगळवारपासूनच लागू करण्यात आले आहे. गृह मंत्रालयने याबाबत आदेश जारी केला आहे. लोकसभेत दुरुस्ती करून 22 मार्च रोजी आणि राज्यसभेत 24 मार्च रोजी हे विधेयक मंजूर करण्यात आले होते. 28 मार्च रोजी त्यास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी मिळाली.

आम आदमी पक्ष आणि काँग्रेसकडून विरोध
या विधेयकाचा काँग्रेससह आम आदमी पक्षाने कडवा विरोध केला होता. विधेयक मंजूर झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते, की हा लोकशाहीसाठी अतिशय वाइट दिवस आहे. आम्ही सत्तेची चावी सामान्य जनतेच्या हातात देण्याचे आमचे प्रयत्न सुरूच ठेवू. कितीही अडथळे आणले तरीही आम्ही आमचे चांगले कार्य सुरूच ठेवणार आहोत, त्यात कधीच खंड पडणार नाही.

बातम्या आणखी आहेत...