आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्ली मद्य घोटाळ्यात EDने आपचे संपर्क प्रभारी विजय नायर आणि व्यापारी अभिषेक बोईनपल्ली यांना अटक केली आहे. दिल्ली अबकारी प्रकरणात मनी लाँड्रिंगवरून ही अटक करण्यात आली आहे. यापूर्वी CBIने दोघांनाही अटक केली होती. त्यानंतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात आपचे विजय नायर यांच्या जामिनावर सुनावणी होणार होती, मात्र त्यापूर्वीच त्यांना EDने अटक केली.
आरोपींचा दावा- CBIला अधिक चौकशीची गरज नाही
दोन्ही आरोपींनी विशेष CBI न्यायालयात जामीन मागितला होता. CBI कोठडीत आपली अधिक चौकशी करण्याची गरज नसल्याचा दावा त्यांनी केला. विजय नायर आणि बोईनापल्ली यांच्या अर्जांना केंद्रीय तपास यंत्रणेनेही विरोध केला होता.
तपास यंत्रणेने सांगितले की, आरोपींनी दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद येथे इतर आरोपींसोबत मद्य धोरण तयार करून त्यातून नफा कमावला होता. या बैठकीत अनेक मद्य व्यावसायिकांचाही सहभाग होता.
चार दिवसांपूर्वी हैदराबादच्या टॉप फार्मा कंपनीच्या प्रमुखासह दोघांना अटक
चार दिवसांपूर्वी EDने दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी दोघांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अरबिंदो फार्माचे प्रमुख शरद रेड्डी आणि विनय बाबू यांची नावे आहेत. हे दोघेही हैदराबादच्या टॉप फार्मा कंपनीचे व्यावसायिक आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे.
याआधी, CBIने आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आणि मीडिया कंपनीचे माजी सीईओ विजय नायर, हैदराबादस्थित व्यापारी अभिषेक बोईनापल्ली यांना अटक केली होती.
विजय नायर यांना महिनाभरापूर्वी अटक करण्यात आली होती
महिन्याभरापूर्वी दिल्ली मद्य घोटाळ्यातील आरोपी विजय नायर याला CBIने अटक केली होती. ते एका एंटरटेन्मेंट आणि इव्हेंट मीडिया कंपनीचे माजी सीईओ आहेत. यापूर्वीही EDने त्याच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. या कथित घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार म्हणून विजयचे वर्णन केले जात आहे. विजय नायर हे मनीष सिसोदिया यांच्या जवळचे आहेत.
CBIने 17 ऑगस्ट रोजी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला
यापूर्वी 17 ऑगस्ट रोजी याप्रकरणी CBIने 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यामध्ये बडी रिटेल प्रायव्हेट लिमिटेड गुरुग्रामचे संचालक अमित अरोरा, दिनेश अरोरा आणि अर्जुन पांडे यांच्या नावांचा समावेश आहे. हे सर्वजण सिसोदिया यांच्या जवळचे असल्याचे बोलले जात आहे. CBIच्या म्हणण्यानुसार, राधा इंडस्ट्रीजचे संचालक दिनेश अरोरा यांनी इंडोस्पिरिट्सच्या समीर महेंद्रू यांच्याकडून एक कोटी रुपये घेतले होते. त्याचबरोबर या प्रकरणात व्यापारी दिनेश अरोरा यांना अधिकृत साक्षीदार करण्यात आले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.