आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीच्या टिळक नगरात शुक्रवारी एका महिलेची चाकू भोसकून निघृण हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह किरायाच्या घरात आढळला. रेखा राणी असे मृत महिलेचे नाव असून, ती आरोपीसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. तिला 16 वर्षांची एक मुलगीही आहे. महिलेचा चेहरा, गळा व हातावर चाकूने वार करण्यात आलेत.
15 वर्षांपासून किरायाच्या घरात राहत होती
यासंबंधीच्या वृत्तानुसार, 35 वर्षीय राणी 15 वर्षांपासून आपल्या मुलीसह किरायाच्या घरात राहत होती. हत्येनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तिच्या घराला कुलूप असल्याचे आढळले. पोलिसांनी दरवाजा तोडून पाहिले असता आत राणीचा मृतदेह होता. आपल्या आईला कुणी ठार मारले हे मुलीला माहिती नाही. आई औषधी घेऊन घरात झोपली असावी असे तिला वाटत होते.
आरोपीने मुलीला सांगितले - आई बाहेर गेली
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिलेच्या मुलीने आपल्या जबाबात सांगितले की, मी माझ्या आईला जागे करण्यासाठी गेले तेव्हा महिलेचा पार्टनर तिथे उपस्थित होता. तिने त्याला विचारले असता त्याने तिची आई बाहेर गेल्याचे सांगितले. तसेच तिलाही बाहेर जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार भीतीने ती बाहेर निघून गेली.
महिलेवर 3 ठिकाणी चाकूने वार
पोलिसांच्या माहितीनुसार, मुलगी बाहेर गेल्यानंतर आरोपीने घराला कुलूप लावून घटनास्थळावरून पोबारा केला. पश्चिम दिल्लीचे पोलिस उपायुक्त घनश्याम बंसल यांनी महिलेची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची पुष्टी केली आहे. ते म्हणाले - महिलेला 3 ठिकाणी चाकू मारण्यात आला. तिच्या चेहऱ्यासह गळ्यावरही चाकू मारण्यात आला. दुसरा वार तिच्या हातावर करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.