आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi Lockdown Extended Till May 17 | Delhi Lockdown Extended, Delhi Lockdown, CM Arvind Kejriwal, Arvind Kejriwal, Delhi Metro Services Suspended, Coronavirus Outbreak

दिल्लीमध्ये लॉकडाऊन वाढले:17 मेपर्यंत लॉकडाऊन लागू राहणार, यावेळी मेट्रोही बंद; केजरीवाल म्हणाले - 'जान है तो जहान है'

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीमध्ये ऑक्सिजनची स्थिती आता नियंत्रणात

दिल्लीमध्ये लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढवण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी सांगितले की, 17 मेच्या सकाळपर्यंत लॉकडाऊन लागू राहिल आणि यावेळी यामध्ये जास्त सावधगिरी बाळगली जाईल. त्यांनी म्हटले की, पुढच्या आठवड्यापर्यंत मेट्रो सेवाही बंद राहतील. कोरोनाची प्रकरणे कमी झाली आहेत, मात्र अजुन सूट दिली जाऊ शकत नाही. जान है तो जहान है.

दिल्लीमध्ये ऑक्सिजनची स्थिती आता नियंत्रणात
केजरीवाल म्हणाले - दिल्लीमध्ये सर्वात मोठी अडचण ऑक्सिजनमध्ये येत होती. सामान्य दिवसांमध्ये जेवढ्या ऑक्सिजनची गरज पडते, त्यापेक्षा अनेक पटींनी जास्त ऑक्सिजनची गरज पडू लागली. हायकोर्टा, सुप्रीम कोर्टाचे आदेश आणि केंद्राच्या सहयोगाने दिल्लीमध्ये ऑक्सिजनची स्थिती सुधारली आहे. पहिले असे ऐकायला मिळत होते की, या रुग्मालयात 2 तासांसाठी ऑक्सिजन राहिले, त्या रुग्णालयात 3 तासांसाठी ऑक्सिजन राहिले. मात्र आता अशी स्थिती नाही.

केजरीवाल म्हणाले - मजबूरीमध्ये या लॉकडाऊनचा निर्णय घेतला
त्यांनी म्हटले - लसीकरण खूप वेगाने सुरू आहे. व्हॅक्सीनच्या स्टॉकची कमतरता आहे. केंद्राकडून मदत मागितली आहे आणि आशा आहे की, सहयोग मिळेल. आम्ही एक्सपर्ट्स लोक आणि सरकारमध्ये चर्चा केली आहे. लॉकडाऊनविषयीही अशीच चर्चा झाली. कोरोनाची प्रकरणे कमी होत आहेत, मात्र संक्रमणाचे प्रमाण 23%च आहे. अशा वेळी कोणतीही सूट देऊ शकत नाही.

केजरीवाल म्हणाले की, लॉकडाऊन वाढवण्याची गरज आहे. जान है तो जहान है. आपण वाचलो तर पुढे खूप काही करु शकतो. नाइलाजास्तव आम्ही एक आठवड्याचे लॉकडाऊन वाढवले आहे. पुढच्या सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन राहिल.

बातम्या आणखी आहेत...