आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Delhi Lockdown News; Arvind Kejriwal Announcement Update | Delhi Coronavirus Second Wave Cases Latest News And Hospital Health System Udpates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीत लॉकडाउन:दिल्लीमध्ये आजपासून 26 एप्रिलपर्यंत लॉकडाउन, केवळ अत्यावश्यक सेवांना राहील सूट; रोज 25 हजार रुग्ण सापडत असल्याने घेतला निर्णय

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या चौथ्या लाटेत रोज 25 हजार कोरोना रुग्ण सापडत असल्याने दिल्ली सरकारने लॉकडाउन जाहीर केले आहे. दिल्लीत आज रात्री 10 वाजल्यापासून 26 एप्रिलच्या पहाटे 5 वाजेपर्यंत लॉकडाउन लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सोमवारी यासंदर्भातील घोषणा केली आहे.

लॉकडाउनची घोषणा करताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, "दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट आली आहे. तिसऱ्या लाटेत रोज सरासरी 8500 प्रकरणे समोर येत होती. जगातील अनेक मोठ्या शहरांमध्ये रोज 6 हजार प्रकरणे येत असताना तेथील आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे पाहिले आहे. आता दिल्लीत कोरोनाची चौथी लाट आलेली असताना तब्बल 25 हजार कोरोना रुग्ण रोज सापडत आहेत. त्यामुळे, आरोग्य यंत्रणा तणावाखाली आहे. यानंतरही कठोर पावले उचलली नाही, तर आरोग्य यंत्रणा कोलमडून जाईल. काल दिल्लीतील एका रुग्णालयात ऑक्सिजन संपले. त्या ठिकाणी मोठी हानी होता-होता टळली."

लॉकडाउनमध्ये राहणार असे निर्बंध

  • दिल्लीत विनाकारण कुणालाही फिरता येणार नाही. केवळ आवश्यक सेवा आणि क्षेत्रांशी संबंधित लोक बाहेर निघू शकतील. सर्व खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम करावे लागेल. सरकारी कार्यालयांमध्ये निम्मे कर्मचारी असतील.
  • व्हॅक्सीनेशनसाठी जाणाऱ्यांना सूट राहील. रेलवे स्टेशन, एअरपोर्ट, बस स्टॉप इत्यादींवर जाण्यासाठी सूट राहील. त्यांना आपले वैध तिकीट दाखवावे लागेल. मेट्रो, बस सेवा सुरू राहतील. पण, 50 टक्के प्रवाशांना परवानगी राहील.
  • बँक, एटीएम आणिर पेट्रोल पंप खुले राहतील. धार्मिक स्थळे खुले राहतील. पण, त्या ठिकाणी धर्मगुरूंना परवानगी राहील. प्रार्थनेसाठी लोकांना गर्दी करता येणार नाही.
  • अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांना आयडी कार्ड दाखवून जाता येईल. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या सार्वजनिक वाहनांना देखील सूट राहील.
  • कुठल्याही सार्वजनिक, राजकीय आणि धार्मिक आयोजन करता येणार नाही. स्टेडिअमवर मॅच असल्यास प्रेक्षकांना परवानगी नाही.
  • सर्व थिएटर्स, ऑडिटोरियम, स्पा, जिम, स्वीमिंग पूल बंद राहतील. लग्न समारंभात 50 पेक्षा अधिक लोकांना बोलावता येणार नाही. त्यातही आधी ठरलेल्या लग्नांनाच परवानगी राहील. त्या करिता प्रवास करण्यासाठी ई-पास घ्यावे लागेल.
बातम्या आणखी आहेत...