आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजधानी दिल्लीत कोरोना महामारीचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे राज्यात ऑक्सिजनसह अत्यावश्यक औषधांचा तुटवडा भासत आहे. कोरोनाची साखळी रोखण्यासाठी केजरीवाल सरकारने 3 मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले होते. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत 10 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. त्यामुळे संपूर्ण दिल्लीत आता 10 मे च्या सकाळी 5 वाजेपर्यंत कडक निर्बंध राहणार आहे.
कोरानाची वाढती पार्श्वभूमी लक्षात घेता राज्य सरकारने 19 एप्रिलपासून एका आठवड्यासाठी लॉकडाऊन लागू केले होते. दरम्यान, त्यांचा कालावधी संपण्यापूर्वीच पुन्हा त्यामध्ये वाढ करण्यात आली होती. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कोरोनाला रोखण्यासाठीचे हे सर्वात प्रभावी हत्यार असल्याचे सांगितले होते.
दिल्लीत शुक्रवारी 27 हजार 047 लोक पॉझिटिव्ह आले
दिल्लीत कोरोनाचे नवीन रुग्ण झपाट्याने वाढतच आहे. गेल्या चोवीस तासांत दिल्लीत 27 हजार 047 लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, यामध्ये 375 लोकांचा मृत्यू झाला होता. राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सतत 20 हजारांवर नवीन रुग्ण आढळत आहेत. 16 एप्रिलला 19 हजार 486 रुग्ण आढळून आले होते. विशेष म्हणजे हा आकडा त्यावेळी 20 हजारांपेक्षा होता.
न्यायालयाने दिल्ली सरकारला विचारले- सैन्यांची मदत का घेतली नाही?
दिल्ली उच्च न्यायालयात ऑक्सिजनच्या कमतरतेवर सुनावणी झाली होती. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने राज्य सरकारला संबंधित कामात सैन्यांची मदत का घेतली नाही याबाबत विचारणा केली. दरम्यान, राज्य सरकारने सांगितले की, आम्ही सध्या उच्चस्तरांवर काम करत असून आमचे याकडे लक्ष आहे. यावर न्यायालयाने म्हटले की, तुम्ही जर सैन्याकडून मदत घेतली तर तुम्ही तुमच्या पातळीवर काम कराल. विशेष म्हणजे त्यांच्याकडे स्वतःची पायाभूत सुविधा आहे.
देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.