आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली महापालिका निवडणूकीची घोषणा:4 डिसेंबरला मतदान, 7 डिसेंबरला मतमोजणी; 50% जागा महिलांसाठी राखीव

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीचे निवडणूक आयुक्त विजय देव यांनी शुक्रवारी दिल्ली महापालिका निवडणुकीची घोषणा केली. दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी 7 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येईल. 4 डिसेंबरला महापालिकेसाठी मतदान होईल. तर 7 डिसेंबरला निवडणुकीची मतमोजणी होईल. दिल्ली महानगरपालिकेत एकूण 250 जागा आहेत. यापैकी अनुसूचित जातींसाठी 42 जागा राखीव आहेत. महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव असतील. दिल्ली महापालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेनंतर केंद्र सरकारने 18 ऑक्टोबरला अधिसूचना जारी केली होती.

दिल्लीतील सर्व 250 वॉर्डांमध्ये ईव्हीएमद्वारे मतदान केले जाईल. यासाठी 50 हजारपेक्षा जास्त ईव्हीएम ठेवण्यात आले आहेत. मतदारांच्या सोयीसाठी निवडणुकीदरम्यान एक लाखांपेक्षा जास्त कर्मचारी तैनात केले जातील. निवडणुकीत 250 एआरओ, 2 हजार सेक्टर मॅजिस्ट्रेट असतील. 68 जनरल ऑब्झर्व्हर तैनात असतील. दिल्लीत आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.

आता मॉडेल बूक ऑफ कन्डक्टची एक बुकलेट जारी केली जाईल. ध्वनीक्षेपकांच्या वापरावर बंदी असेल. ध्वनीक्षेपकांच्या वापरासाठी परवानगी घ्यावी लागेल. परवानगी घेतल्यानंतरही रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकांचा वापर केला जाऊ शकणार नाही. दिल्लीत अवैध होर्डिंग्स आणि पोस्टर्सविरोधात कारवाई केली जाईल.

उमेदवारांना 68 ठिकाणी सकाळी 10 ते 3 या वेळेत अर्ज दाखल करावे लागतील. एक उमेदवार निवडणूक प्रचारासाठी 8 लाख रुपये खर्च करू शकेल. गेल्या निवडणुकीत ही मर्यादा 5.75 लाख होती.

भाजप आणि आपमध्ये आरोप-प्रत्यारोप

आम आदमी पक्षाने अलीकडेच दावा केला होता की, 2017 प्रमाणेच भाजपने त्यांच्या विद्यमान नगरसेवकांना भ्रष्टाचारात सहभागी झाल्यामुळे MCD निवडणुकीत उभे न करण्याचा निर्णय घेतला आहे.

आम आदमी पार्टीचे एमसीडी निवडणूक प्रभारी दुर्गेश पाठक यांनी भाजप नगरसेवकांवर 35,000 कोटी रुपये हडप केल्याचा आरोप केला होता. दुसरीकडे, दुर्गेश पाठक यांनी चर्चेत राहण्यासाठी असे कुभांड रचल्याचा आरोप करत दिल्ली भाजपने प्रत्युत्तर दिले होते.

पूर्वी एवढी होती वॉर्डांची संख्या

1 जानेवारी 2022 पर्यंत दिल्लीत सुमारे 1.48 कोटी मतदार होते. एमसीडीच्या सीमांकनानंतर गृह मंत्रालयाने (एमएचए) मंगळवारी अधिसूचना जारी केली होती, त्यानंतर एमसीडी निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या 800 पानांच्या अधिसूचनेमध्ये दिल्ली महानगरपालिकेच्या प्रभागांची संख्या आता 250 होईल, असे म्हटले होते. महापालिका एकत्र येण्यापूर्वी 70 विधानसभा मतदारसंघात 272 प्रभाग होते.

महापालिकांचे एकत्रीकरण

यावेळी सरकारने दिल्ली महापालिकांचे एकत्रीकरण केले आहे. तथापि, महापालिका अधिक सशक्त व्हाव्यात, जनतेला अधिक लाभ व्हावा, याच्या तरतुदी MCD एकीकरण कायद्यात नाहीत. याशिवाय महापालिकेच्या दिवाळखोरीचे कारण काय, नगरसेवक आणि महापौर शक्तिशाली होण्याच्या किंवा त्यांना मिळणाऱ्या नवीन अधिकारांचा कोणताही उल्लेख या कायद्यात नाही.

बातम्या आणखी आहेत...