आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्ली महानगरपालिका (MCD) निवडणूकीचे एक्झिट पोल येऊ लागले आहेत. सुरूवातीच्या ट्रेंडमध्ये देशातील सर्वात मोठ्या महानगरपालिकेपैकी एक MCD ची सत्ता 15 वर्षांनंतर भाजपच्या हातातून आम आदमी पक्षाकडे (आप) निसटताना दिसत आहे.
इंडिया टुडे- अॅक्सिस माय इंडिया आणि टाइम्स नाऊ-ईटीजीच्या जाहीर झालेल्या एक्झिट पोवनुसार, एमसीडीमध्ये प्रचंड बहुमताने 'आप' सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. भाजप पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर तर कॉंग्रेसचा जवळपास पूर्णतः सफाया होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणानुसार, एमसीडीमधील एकूण 250 जागांपैकी AAPला 149 ते 171, भाजपला 69 ते 91 आणि काँग्रेसला 3 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे. आपचा आकडा बहुमताच्या म्हणजेच 126 जागांपेक्षा जास्त आहे.
लोकसभा-विधानसभेत काँग्रेसकडे एकही जागा नाही
2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणूकीत दिल्लीतील सर्व सात जागा भाजपने जिंकल्या होत्या, तर काँग्रेस आणि आप आपले खातेही उघडू शकले नाहीत. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत 70 जागांपैकी 'आप'ला 62 जागा आणि भाजपला 8 जागा मिळाल्या, तर 2015 च्या विधानसभा निवडणुकीत 'आप'ला 67 आणि भाजपला 3 जागा मिळाल्या. 2020 आणि 2015 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही.
1,349 उमेदवार रिंगणात उतरले होते
2022 च्या MCD निवडणुकांसाठी 1349 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी 709 महिला उमेदवार होत्या. भाजप आणि आपने सर्व 250 जागांवर आपले उमेदवार उभे केले, तर काँग्रेसचे 247 उमेदवार निवडणूक लढले. JDU ने 23 जागांवर उमेदवार उभे केले, तर AIMIM ने 15 जागांवर उमेदवार उभे केले. बसपने 174, राष्ट्रवादीने 29, इंडियन मुस्लिम लीगने 12, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (सीपीआय) 3, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकने 4 आणि सपा, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांनी प्रत्येकी एक जागा दिली. याशिवाय 382 अपक्ष उमेदवार होते.
13,638 मतदान केंद्रांवर मतदान
निवडणूक आयोगाने संपूर्ण दिल्लीत १३,६३८ मतदान केंद्रे स्थापन केली होती. यामध्ये सुमारे एक लाख कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मतदारांच्या सोयीसाठी 68 मॉडेल मतदान केंद्रे आणि 68 गुलाबी मतदान केंद्रे उभारण्यात आली. या मतदान केंद्रांवर एकूण 40 हजार जवान तैनात करण्यात आले होते. निवडणुकीत 56,000 ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात आला. पारदर्शक मतदानासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही बसवले होते.
दिल्ली महापालिका कसे काम करते?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.