आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi MCD Election Likely To Be Announced Today, Election Commission Press Conference Updates, AAP, Arvind Kejriwal Vs Delhi BJP

दिल्ली महापालिका निवडणुकीचे वेध:आज तारीख जाहीर होण्याची शक्यता, निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली महानगरपालिका निवडणूक- 2022 आज जाहीर होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आज दुपारी 4 वाजता निगम भवन, काश्मिरी गेट येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत MCDच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

दिल्ली महानगरपालिकेच्या 250 जागांपैकी 42 जागा अनुसूचित जातींसाठी (SC) राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव असतील. या जागांवरही मार्किंग करण्यात आले आहे.

दिल्ली महानगरपालिकेच्या प्रभागांच्या सीमांकनानंतर केंद्र सरकारने 18 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली होती. अधिसूचनेत, आयोगाने म्हटले होते की मुख्य निवडणूक अधिकार्‍यांची सुधारित मतदार यादीची अंतिम तारीख 1 जानेवारी 2022 आहे, ती MCD निवडणुकीसाठी मतदार यादी मानली जाईल. अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, याचा अर्थ 1 जानेवारी 2022 पर्यंत जे मतदार झाले असतील तेच आगामी MCD निवडणुकीत मतदान करू शकतील.

भाजप आणि आपमध्ये आरोप-प्रत्यारोप

आम आदमी पक्षाने अलीकडेच दावा केला होता की, 2017 प्रमाणेच भाजपने त्यांच्या विद्यमान नगरसेवकांना भ्रष्टाचारात सहभागी झाल्यामुळे MCD निवडणुकीत उभे न करण्याचा निर्णय घेतला आहे.

आम आदमी पार्टीचे एमसीडी निवडणूक प्रभारी दुर्गेश पाठक यांनी भाजप नगरसेवकांवर 35,000 कोटी रुपये हडप केल्याचा आरोप केला होता. दुसरीकडे, दुर्गेश पाठक यांनी चर्चेत राहण्यासाठी असे कुभांड रचल्याचा आरोप करत दिल्ली भाजपने प्रत्युत्तर दिले होते.

पूर्वी एवढी होती वॉर्डांची संख्या

1 जानेवारी 2022 पर्यंत दिल्लीत सुमारे 1.48 कोटी मतदार होते. एमसीडीच्या सीमांकनानंतर गृह मंत्रालयाने (एमएचए) मंगळवारी अधिसूचना जारी केली होती, त्यानंतर एमसीडी निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या 800 पानांच्या अधिसूचनेमध्ये दिल्ली महानगरपालिकेच्या प्रभागांची संख्या आता 250 होईल, असे म्हटले होते. महापालिका एकत्र येण्यापूर्वी 70 विधानसभा मतदारसंघात 272 प्रभाग होते.

महापालिकांचे एकत्रीकरण

यावेळी सरकारने दिल्ली महापालिकांचे एकत्रीकरण केले आहे. तथापि, महापालिका अधिक सशक्त व्हाव्यात, जनतेला अधिक लाभ व्हावा, याच्या तरतुदी MCD एकीकरण कायद्यात नाहीत. याशिवाय महापालिकेच्या दिवाळखोरीचे कारण काय, नगरसेवक आणि महापौर शक्तिशाली होण्याच्या किंवा त्यांना मिळणाऱ्या नवीन अधिकारांचा कोणताही उल्लेख या कायद्यात नाही.

बातम्या आणखी आहेत...