आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीतील एमसीडीच्या महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सदस्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया गोंधळामुळे तीन तास उलटूनही सुरू झाली नाही. सकाळी 11 वाजता नगरसेवकांचा शपथविधी सुरू होणार होता. पीठासीन अधिकाऱ्यांनी प्रथम नामनिर्देशित सदस्यांना शपथ देण्यास सुरुवात केली. यावेळी आम आदमी पक्षाच्या (आप) सदस्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. आपच्या निषेधाला भाजप नगरसेवकांनी विरोध केला. आपचे नगरसेवक पीठासीन अधिकाऱ्याच्या आसनावर चढले. यावेळी काही नगरसेवक खुर्ची उचलून शिवीगाळ करताना दिसले. काहीजण धक्का लागून खाली पडले. तर यात काहींना दुखापत झाली.
आधी जाणून घ्या… कुठून सुरू झाला वाद
महापौरपदाच्या निवडणुकीसाठी एलजीने भाजप नगरसेवक सत्य शर्मा यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली. 'आप'ने मुकेश गोयल यांचा प्रस्ताव ठेवला होता. यावर आप ने आक्षेप घेतला. यानंतर, प्रोटेम स्पीकरने एलजीच्या नामनिर्देशित सदस्यांना शपथ देण्यास सुरुवात करताच आम आदमी पार्टीने निषेध नोंदवत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
दुसरीकडे, काँग्रेसने महापौरपदाच्या निवडणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत 273 सदस्य मतदान करणार आहेत. बहुमतासाठी 133 चा आकडा आवश्यक आहे. 'आप'कडे 150 तर भाजपकडे 113 मते आहेत.
महापौर निवडणुकीच्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स...
आप आणि भाजप यांच्यात लढत
'आप'च्या आदमी पक्षाने शैली ओबेरॉय यांना महापौरपदासाठी उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून रेखा गुप्ता रिंगणात आहेत. तर 'आप'ने मोहम्मद इक्बाल आणि कमल बागडी यांना उपमहापौरपदासाठी उमेदवारी दिली आहे.
निवडणुकीत 3 रंगीत बॅलेट पेपरचा वापर
या निवडणुकीसाठी रंगसंगती निश्चित करण्यात आली आहे. पांढऱ्या, हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या मतपत्रिका वापरल्या जाणार आहेत. यामध्ये पांढऱ्या बॅलेट पेपरने महापौरपदासाठी मतदान होणार आहे. उपमहापौर निवडणुकीसाठी हिरवी बॅलेट पेपर आणि स्थायी समिती सदस्यांसाठी गुलाबी बॅलेट पेपरचा वापर करण्यात येणार आहे.
केजरीवाल यांना महापौर बनवावे
दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी म्हणाले की, दिल्लीच्या जनतेने आम आदमी पार्टीला कौल दिला आहे. जनतेचा आदर करत महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीची निवडणूक आम्ही लढवणार नाही. 'आप'ला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे केजरीवाल यांना महापौर करावे आणि दिल्लीच्या जनतेची सेवा करावी.
आपकडे बहुमत
महापौरपदाच्या निवडणुकीत 273 सदस्यांचे मतदान होणार आहे. बहुमतासाठी 138 चा आकडा आवश्यक आहे. काँग्रेसच्या अनुपस्थितीत 133 चा आकडा आवश्यक आहे. आपचे 134 नगरसेवक आहेत. याशिवाय 3 राज्यसभा खासदार आणि 13 आमदार आहेत. भाजपकडे 7 खासदार आणि 1 आमदार अशी एकूण 113 मते आहेत. तेथे काँग्रेसचे 9 तर अपक्षांचे दोन नगरसेवक आहेत. या निवडणुकीत 10 खासदारांसह 250 नगरसेवक (7 लोकसभा खासदार आणि 3 राज्यसभा खासदार), 13 विधानसभा सदस्य मतदान करतील.
निवडणुकीपूर्वी, अरविंद केजरीवाल आणि लेफ्टनंट गव्हर्नर (एलजी) व्ही के सक्सेना यांच्यातील मतभेद समोर आले आहेत. प्रोटेम स्पीकरसाठी मुकेश गोयल यांना आपने प्रस्तावित केले होते. परंतु एलजीने प्रोटेम स्पीकर म्हणून भाजप नगरसेवक सत्य शर्मा यांची नियुक्ती केली.
केजरीवाल यांनी या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. केजरीवाल म्हणाले की, एमसीडीमधील नामांकन दिल्लीच्या नगरविकास मंत्र्यांमार्फत पाठवले जातात. परंतु एमसीडीच्या आयुक्तांनी थेट एलजीकडे फाइल पाठवल्या. त्यांनी एलजीला पत्र लिहून या प्रकरणाचा पुनर्विचार करण्यास सांगितले आहे.
भाजप 15 वर्षानंतर MCD सत्तेतून बाहेर
'आप'ने दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) भाजपकडून हिसकावून घेतली आहे. 15 वर्षे भाजपची सत्ता होती. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, 250 जागांपैकी AAP ने 130 जागा जिंकल्या आहेत. 4 वर आघाडीवर आहे. तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. पक्षाला 99 जागा मिळाल्या. 4 वर आघाडी कायम ठेवली. काँग्रेसने 7 जागा जिंकल्या आहेत. 3 वर आघाडी आहे. MCD मध्ये बहुमतासाठी 126 जागांची आवश्यकता होती. येथे वाचा संपुर्ण बातमी.
दिल्ली महापालिका कसे काम करते?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.