आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​महिलांसाठी दिल्ली सर्वात असुरक्षित:मुंबई दुसऱ्या, बंगळुरु तिसऱ्या क्रमांकावर; राजधानीत महिलांवरील गुन्ह्यांत 40% वाढ

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली देशातील महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्यूरोच्या ( NCRB) आकडेवारीनुसार, दिल्लीत 2020 मध्ये महिलांविरोधातील 9782 गुन्हे नोंदवण्यात आले. यामुळे 2021 मध्ये हा आकडा 40 टक्क्यांनी वाढून 13892 वर पोहोचला आहे. दिल्लीनंतर मुंबई 5543 गुन्ह्यांसह दुसऱ्या तर बंगळुरू 3127 गुन्ह्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

महिलांवरील गुन्ह्यांचे मुंबईत 12.76% व बंगळुरुत 7.2% गुन्हे नोंदवण्यात आले. देशातील 19 मोठ्या शहरांत झालेल्या एकूण गुन्ह्यांपैकी दिल्लीत सर्वाधिक 32% गुन्हे नोंदवण्यात आले.

2021 मध्ये दिल्लीत महिलांविषयीचे सर्वाधिक गुन्हे

  • दिल्लीत इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत अपहरणाचे 3948 गुन्हे दाखल करण्यात आले.
  • पतींकडून क्रौर्याचे 4674 व अल्पवयीनांवरील बलात्काराचे 833 गुन्हे दाखल करण्यात आले.
  • दिल्लीत दररोज सरासरी 2 मुलींवर बलात्कार करण्यात आला.
  • हुंड्यासाठी हत्येचे 136 गुन्हे दाखल झाले.
19 मोठ्या शहरांत महिलांच्या अपहरणाचे 8664 गुन्हे दाखल झाले, तर एकट्या दिल्लीत 3948 गुन्हे नोंदवण्यात आले.
19 मोठ्या शहरांत महिलांच्या अपहरणाचे 8664 गुन्हे दाखल झाले, तर एकट्या दिल्लीत 3948 गुन्हे नोंदवण्यात आले.

दिल्लीत दररोज अल्पवयीनांवर रेप

आकडेवारीनुसार, दिल्लीत 2021 मध्ये दररोज 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाला. गतवर्षी 19 मोठ्या शहरांतील महिलांविरोधातील गुन्ह्यांचे 43,414 प्रकरणे नोंदवण्यात आली. यापैकी दिल्लीत 13,982 गुन्हे नोंदवण्यात आले. हुंड्यासाठी हत्येचे 136 गुन्हे नोंदवण्यात आले. हा आकडा महानगरांत होणाऱ्या एकूण मृत्यूंच्या तुलनेत 36.26% आहे.

POCSO अंतर्गत 1,357 गुन्हे दाखल

दिल्लीत गतवर्षी महिलांचा विनयभंग झाल्याचे 2022 गुन्हे दाखल झाले. एनसीआरबीने सांगितले की, 2021 मध्ये पोक्सो कायद्यांतर्गत 1357 गुन्हे दाखल झाले. यात मुलींवरील बलात्काराच्या 833 गुन्ह्यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...