आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे:महामार्गावर 4 लेन फक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठीच असतील; 1350 किमी लांब ग्रीनफील्ड एक्स्प्रेस-वेचे 350 किमी काम पूर्ण

दिल्ली/ जयपूरएका वर्षापूर्वीलेखक: डी. डी. वैष्णव
  • कॉपी लिंक
  • मुंबई ते दिल्लीपर्यंतचा प्रवास १३ तासांत पूर्ण होणार, सध्या २५ तास लागतात

दिल्ली ते मंुबईदरम्यान बांधकाम सुरू असलेला १,३५० किमी लांब ग्रीनफील्ड एक्स्प्रेस-वे वेळ तर वाचवेलच, शिवाय प्रदूषणही घटवेल. १ लाख कोटी रुपये खर्चून तयार होत असलेल्या या एक्स्प्रेस-वेवर ३५० किमीपर्यंत काम झाले आहे. सध्या ८ लेन तयार होत आहेत. त्याशिवाय आणखी ४ लेन वाढवल्या जाऊ शकतील. २ जाण्यासाठी आणि २ येण्यासाठी. या ४ लेन फक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठी असतील.

डेडिकेटेड इलेक्ट्रिक व्हेइकल फोर लेन असलेला हा देशातील पहिला एक्स्प्रेस-वे असेल. एक्स्प्रेस-वेच्या बाजूला नवीन औद्योगिक वसाहत आणि स्मार्ट सिटी बनवण्याचाही प्रस्ताव आहे. त्याचा सर्व्हे सुरू आहे. संपूर्ण मार्गावर ९२ ठिकाणी इंटरव्हल स्पॉट विकसित केले जातील. रस्ते आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, एक्स्प्रेस-वेचे काम २०२३ पर्यंत पूर्ण होईल. तथापि, कोविडमुळे कामाला विलंब झाला होता.

एक्स्प्रेस-वेमुळे दरवर्षी ३२ कोटी लिटर इंधन वाचेल

  • सुरक्षेसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना १.५ मीटर उंच भिंत बांधली जाईल.
  • टोल प्लाझा हायवेऐवजी स्लिप लेनमध्ये तयार होतील. त्यामुळे ज्या शहरांत जाल तेवढाच टोल लागेल.
  • दर २.५ किमीनंतर पशूंसाठी ओव्हरपास तयार केले जातील. दर ५०० मीटरवर एक अंडरपास असेल.
  • दर ५० किमीवर दोन्ही बाजूंना फॅसिलिटी सेंटर असतील. तेथे रेस्तराँ, फूड कोर्ट, सुविधा स्टोअर, इंधन स्टेशन, ईव्ही चार्जिंग पॉइंट आणि शौचालय इत्यादी असेल.
  • एक्स्प्रेस-वेवर वाहनांसाठी १२० किमी/तासाची वेगमर्यादा असेल.
  • दिवे सौर ऊर्जेवर चालतील. पावसाचे पाणी जमा करण्यासाठी हार्वेस्टिंग यंत्रणा तयार होत आहे.
  • या हायवेमुळे दर वर्षी ३२ कोटी लिटर इंधन वाचेल, त्यामुळे दर वर्षी ८५ कोटी किलो कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जन कमी होईल.

रणथंबोर व्याघ्र अभयारण्यात विशेष कॉरिडॉर
रणथंबोर व्याघ्र अभयारण्यात वाघांना त्रास होऊ नये यासाठी ५४.४ किमी लांबीचा कॉरिडॉर तयार होईल. व्याघ्र अभयारण्याजवळून ३ मीटर उंच भिंतीचा कॉरिडॉर तयार होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तो साउंडप्रूफ असेलच, शिवाय वन्य प्राण्यांना रस्त्यावर येण्यापासूनही रोखेल.
डिव्हायडरवर रोपे लावली जात आहेत.

मुंबई ते दिल्लीपर्यंतचा प्रवास १३ तासांत पूर्ण होणार, सध्या २५ तास लागतात
एक्स्प्रेस-वेमुळे दिल्ली-मुंबईदरम्यानचे अंतर १५० किमीने कमी होईल. फक्त १३ तासांत प्रवास पूर्ण होऊ शकेल. सध्या रस्तामार्गे दिल्लीहून मुंबईला पोहोचण्यास २५ तास लागतात. दिल्ली आणि मुंबईला जोडणाऱ्या एनएच-८ वर सध्या वाहनांचा प्रचंड दबाव आहे. या मार्गावर रोज १ लाख वाहने धावतात. ही वाहने एक्स्प्रेस-वेवर शिफ्ट होतील.

बातम्या आणखी आहेत...