आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली निवडणूक:दिल्ली मनपात 66% विजेते नगरसेवक 41 ते 70 वयोगटातील, 53% महिला

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या २५० पैकी ५१% नगरसेवक इयत्ता ५वी ते १२ दरम्यान शिकलेले आहेत. ६६ टक्क्यांचे वय ४१-७० असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालात देण्यात आली आहे. डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि दिल्ली इलेक्शन वॉचने २४८ विजेत्यांच्या प्रतिज्ञापत्राचे विश्लेषण केले. उर्वरित दोघांचे पूर्ण प्रतिज्ञापत्र उपलब्ध होऊ शकले नाही. २४८ पैकी १३२(५३%) विजेत्या महिला आहेत. २०१७ मध्ये २६६ नगरसेवकांमध्ये १३९(५२%) महिला विजयी झाल्या होत्या. २०१७ मध्ये तत्कालीन ३ मनपा रचनेत २७० प्रभाग होते.

दोन निरक्षर विजयी १२६ विजेत्यांनी इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेतल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. ४ विजयी उमेदवार पदवीकाधारक आणि दोन विजेते निरक्षर आहेत. ८४ विजेते(३४%) २१ ते ४० वयोगटातील आहेत. १६४(६६%) विजेते ४१ ते ७० वयोगटातील आहेत.

बातम्या आणखी आहेत...