आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • New Delhi Youth Killed For Stealing Mobile Phone | Factory Workers Beat Them With Belts And Pipes

मोबाईल चोरल्यामुळे तरुणाची हत्या:फॅक्ट्रीत कामगारांनी बेल्ट आणि पाईपने मारले, धडा शिकवण्यासाठी केसही कापले

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील एका कारखान्यात मोबाईल चोरल्याच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण करत मारून टाकण्यात आले. उत्तर दिल्लीतील सराय रोहिल्ला येथे शनिवारी ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय इजहारने पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास कारखान्यात प्रवेश करून एक मोबाईल चोरला. तेथे उपस्थित ज्ञानी नावाच्या व्यक्तीने त्याला पाहिले.

त्याने इजहार पाहताच आरडाओरडा सुरू केला आणि कारखान्यातील इतर लोक तेथे जमा झाले. सर्वांनी इजहारला पकडले. यानंतर सर्वांनी मिळून त्याला लाथ-बुक्क्या, बेल्ट आणि प्लॅस्टिकच्या पाईपने इतकी मारहाण केली की त्याचा जागीच मृत्यू झाला.

मारहाण करून रस्त्यावर फेकले
इजहारच्या मृत्यूनंतर आरोपींनी त्याला रस्त्यावर फेकून दिले. मृतदेह पाहताच लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना इजहारच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्या. त्याचे केसही कापलेले होते, जे आजूबाजूला विखुरलेले होते.

CCTV फुटेजमधून आरोपी पकडले
सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर मुख्य आरोपी ज्ञानी याला रविवारी अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान ज्ञानीने सांगितले की, त्याने इतर कर्मचाऱ्यांसोबत इजहारला बेदम मारहाण केली आणि धडा शिकवण्यासाठी त्याचे केसही कापले. या घटनेतील फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. त्याचवेळी, सर्वांविरुद्ध आयपीसी कलम 302, 201,34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...