आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत 25 वर्षीय तरुणाची हत्या VIDEO:दिल्लीच्या बदरपूरची घटना, सीसीटीव्हीत घटना कैद, दोन जणांवर गुन्हा दाखल

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील बदरपूर भागात राहणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणाची काही लोकांनी बेदम मारहाण करून हत्या केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ताजपूर टेकडीच्या बाल्मिकी मोहल्लामध्ये पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. केशव (काके) यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. विकी आणि कोहीनूर असे हत्या करणाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढील तपास करित आहेत.

तीन तरुणांनी या व्यक्तीला मारहाण करून बदरपूर परिसरात आणले.
तीन तरुणांनी या व्यक्तीला मारहाण करून बदरपूर परिसरात आणले.

20 डिसेंबर रोजीची रात्री 8 च्या सुमारास ही बाब समोर येत आहे. सीसीटीव्ही आता समोर आले आहेत. तरूणाला मारहाण करत असताना मागून तिघेजण एका तरुणाला घेऊन येत असल्याचे दिसून येत आहे. यानंतर दोन आरोपींनी तरुणावर चाकूने हल्ला केला. आरोपींनी त्याच्यावर हल्ला करताच घटनास्थळी असलेले लोक धावत सुटले. मारेकरी देखील फरार झाले. त्यानंतर काही लोकांनी त्या तरूणास रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.

दोघांनी तरुणावर चाकूने हल्ला केल

तीन जण त्या तरूणास मारहाण करित होते. त्यातील दोघांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. आणि तिघेही पळून गेले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विकी आणि कोहिनूर या दोन आरोपींची ओळख पटली आहे. एक आरोपी फरार आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...