आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीतील अहिल्याबाई नर्सिंग कॉलेजच्या एका वॉर्डनने 2 विद्यार्थिनींचे कपडे काढून चोरीची चौकशी केली. ही घटना मंगळवारी घडली. पीडित विद्यार्थिनींनी पोलिसांना फोन करून या प्रकाराची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पोलिसांनी शून्य एफआयआर नोंदवला. तो लवकरच टिळक मार्ग पोलिसांना पाठवला जाईल.
दुसरीकडे, महाविद्यालयाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी प्राचार्य व वरिष्ठ शिक्षकांचा समावेश असलेली सत्य शोधन समिती स्थापन करत वॉर्डनची वसतिगृहातून हकालपट्टीही केली आहे.
वाचा संपूर्ण प्रकरण...
अहिल्याबाई कॉलेज ऑफ नर्सिंग, एलएनजेपी हॉस्पिटलमधील बीएससी नर्सिंगच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी वॉर्डनसह मंडी हाऊसमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे वॉर्डनच्या बॅगमधून 8000 रुपये चोरीला गेले. त्यांनी 2 विद्यार्थिनींवर चोरीचा संशय व्यक्त केला.
तेथून परत येताना वॉर्डनने इतर विद्यार्थिनींच्या मदतीने दोन्ही संशयित विद्यार्थिनींच्या कपड्यांची झडती घेतली. पण त्यांच्याकडे पैसे मिळाले नाही. विद्यार्थिनींची छेडछाड व विवस्त्र केल्याच्या घटनेशी संबंधित पीसीआर कॉल मंगळवारी दुपारी 1 वाजता पोलिसांकडे पोहोचला. त्यानंतर पोलिसांनी शून्य एफआयआर नोंदवला.
नातेवाईक पोहोचल्यावर कॉलेजची कारवाई
या घटनेनंतर विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी वसतिगृहात धाव घेतली. त्यांनी कॉलेज प्रशासनाकडे वॉर्डनची तक्रार केली. मुलींच्या नातेवाईकांनी मुलींना विवस्त्र केल्याची तक्रार आयपी इस्टेट पोलिस ठाण्यातही केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी भादंवि कलम 354 अंतर्गत शून्य एफआयआर नोंदवला आहे. हा एफआयआर लवकरच टिळक मार्ग पोलिसांकडे वर्ग केला जाईल.
जाणून घ्या शून्य FIR म्हणजे काय
फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) च्या कलम-154 अंतर्गत, पोलिसांवर शून्य एफआयआर नोंदवण्याची जबाबदारी आहे. याचा अर्थ असा आहे की, एखादा व्यक्ती किंवा पीडितेने एखाद्या पोलिस ठाण्यात गुन्ह्याची तक्रार किंवा माहिती दिली. पण ते क्षेत्र त्या पोलिस ठाण्यांतर्गत येत नसेल, तरीही तो एफआयआर दाखल करू शकतो. आतापर्यंत महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये असेच घडत होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.