आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा धोका:जम्मू-कश्मीरमधून रवाना झालेले 4-5 दहशतवादी शहरात घुसण्याची शक्यता, गुप्तचरांच्या माहितीनंतर हाय अलर्ट 

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीतील सर्व 15 पोलिस जिल्ह्यांसह क्राइम ब्रांचही हाय अलर्टवर आहे
  • सीमेवरील हालचालींवर विशेष लक्ष, बाजारपेठांमध्ये आणि रुग्णालयांमध्येही विशेष पाळत

दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेता दिल्लीला हाय अलर्ट करण्यात आले आहे. न्यूज एजेंसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांना दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाली आहे. दिल्लीमध्ये 4-5 दहशतवादी घुसू शकतात.

दिल्लीतील सर्व 15 पोलिस जिल्ह्यांसह क्राइम ब्रांच आणि स्पेशल सेलही हाय अलर्टवर आहेत. राज्याच्या सीमेवरील वाहतुकीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. बाजारपेठ आणि रुग्णालयांमध्येही पाळत ठेवण्यात आली आहे.

काश्मीरमध्ये रजिस्ट्रेशनच्या गाड्याची तपासणी 

मीडिया रिपोर्टनुसार दहशतवादी जम्मू-काश्मीरमधून ट्रकमधून निघाले आहेत. ते बस, कार किंवा टॅक्सीने दिल्लीत प्रवेश करू शकतात. दिल्लीतील सर्व हॉटेल आणि गेस्ट हाऊसवर लक्ष ठेवले जात आहे. काश्मीरच्या रजिस्ट्रेशन क्रमांकाच्या गाड्यांचा शोध शहरात घेण्यात येत आहे. सर्व बसस्थानक आणि रेल्वे स्थानकांनाही सतर्क करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...