आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Delhi Oxygen Updates: The Tanker Arrived At A Hospital In Delhi 30 Minutes Before The Oxygen Ran Out; 500 Patients Rescued; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्राणवायू:दिल्लीतील एका रुग्णालयात ऑक्सिजन संपण्याच्या 30 मिनिटांपूर्वी पोहोचला टँकर; 500 रुग्ण बचावले

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात ऑक्सिजन संपण्याच्या 30 मिनिटे आधी ऑक्सिजनचा टँकर पोहोचला.

दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात ऑक्सिजन संपण्याच्या ३० मिनिटे आधी ऑक्सिजनचा टँकर पोहोचला. त्यामुळे सुमारे ५०० रुग्णांचे प्राण वाचू शकले. दिल्लीच्या रुग्णालयांत ऑक्सिजनची उपलब्धता कमी असल्यावरून आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी मंगळवारी रात्री १०.३० वाजता ट्वीट केले. त्यांनी एक संदेश पाठवला-‘गुरू तेगबहादूर (जीटीबी) रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. जीटीबीमध्ये केवळ चार तास पुरेल एवढा म्हणजे बुधवारी पहाटे २ वाजेपर्यंतचा ऑक्सिजन आहे.’ त्यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना टॅग करून समस्येवर उपाययोजनेसाठी आॅक्सिजनचा पुरवठ्याची मागणी केली.

त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये जीटीबी रुग्णालय व मेडिकल सायन्सचे प्रिन्सिपल अनिल जैन यांचाही संदेश शेअर केला. त्यात मोदीनगरहून ऑक्सिजनचा पुरवठा करणारी व्यक्ती येण्यास असमर्थ आहे, असे नमूद केले होते. दिल्ली किंवा इतर राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करू नये यासाठी त्यांच्यावर दबाव आहे. मोठे संकट टाळण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे, असे सत्येंद्र जैन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानंतर १.३० वाजता ऑक्सिजन टँकर रुग्णालयात पोहोचला. त्यामुळे सुमारे ५०० रुग्णांचे प्राण वाचू शकले.

आम्ही तर आशा सोडली होती, असे एका डॉक्टरने भावुक होऊन सांगितले. कारण, वेळ निघून जात होती. रुग्णांना ही गोष्ट कळू नये, असे डॉक्टरांना वाटत होते. ते सगळे प्रामाणिकपणे भगवंताकडे चमत्कारासाठी प्रार्थना करत होते. त्याच वेळी ऑक्सिजनचा टँकर आल्याचे पाहून सगळ्या डॉक्टरांचे डोळे आनंदाने पाणावले.

बातम्या आणखी आहेत...