आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्ली पोलिसांनी OYO च्या एका हॉटेलच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हे तिन्ही कर्मचारी हॉटेलमध्ये येणाऱ्या कपल्सचे अश्लिल व्हिडिओ तयार करून त्यांना ब्लॅकमेल करत होते. हा गोरखधंदा दिल्लीच्या हॉटेल द ग्रेट इनमध्ये सुरू होता. या हॉटेलमध्ये गेलेल्या एका व्यक्तीने तक्रार दाखल केल्यानंतर हा घटना उघडकीस आला.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, या हॉटेलमध्ये गेलेल्या एका व्यक्तीचा तेथील कर्मचाऱ्यांनी अश्लिल व्हिडिओ तयार केला होता. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करणे सुरू केले. पीडित व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, व्हिडिओ डिलीट करण्याच्या मोबदल्यात आरोपींनी तब्बल 5 लाख रुपयांची मागणी केली.
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात स्पष्ट झाले की, सदर हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका माजी रिसेप्शनिस्टने आपल्या 2 मित्रांना हॉटेलवर नोकरीवर ठेवले होते. त्यानंतर या तिन्ही मित्रांनी हॉटेलवर येणाऱ्या ग्राहकांना ब्लॅकमेल करण्याचा प्लॅन बनवला. यासाठी तिघांनी ग्राहकांचे अश्लिल व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. यासाठी ते हॉटेलच्या खोल्यांत छुपा कॅमेरा लावत होते. त्यानंतर व्हिडिओ रेकॉर्ड करून इंस्टाग्रामवर ग्राहकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होते.
या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी गत 30 मार्च रोजी विजय नामक एका आरोपीला अटक केली. आरोपी उत्तर प्रदेशच्या हापूडचा रहिवासी आहे. चौकशीत त्याने आपल्या इतर 2 मित्रांची माहिती दिली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी अंकुर व दिनेश या दोघांना बेड्या ठोकल्या.
मास्टरमाइंड विजयने पोलिसांना सांगितले की, तो त्याला मिळणाऱ्या सॅलरीवर समाधानी नव्हता. यामुअळे त्याने हॉटेलवर येणाऱ्या ग्राहकांचे अश्लिल व्हिडिओ तयार करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्लॅन तयार केला. ऑगस्ट 2022 मध्ये त्याने हॉटेलची नोकरी सोडली. पण त्याच्या 2 मित्रांनी तिथे नोकरी करणे सुरू ठेवले. आता पोलिसांनी तिन्ही मित्रांना बेड्या ठोकून तुरुंगात डांबले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.