आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या पासपोर्टवरून वडिलांचे नाव हटवण्याचा आदेश:आईच्या याचिकेवर HCचा निर्णय, वडिलांनी जन्माआधीच मुलाला सोडले होते

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका अल्पवयीन मुलाच्या पासपोर्टवरून वडिलांचे नाव हटवमुण्याचा आदेश दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. मुलाच्या आईने याविषयीची याचिका कोर्टात दाखल केली होती. मुलाच्या वडिलांनी जन्मापूर्वीच त्यांना सोडून दिल्याचे आईने कोर्टात सांगितले होते. एकटीने मुलाचे संगोपन केल्याचे या आईने कोर्टात सांगितले. यावर कोर्टाने निर्णय देताना पासपोर्ट अथॉरिटीला आदेश दिले आहेत.

वडिलांनी सोडले, म्हणून पासपोर्टवरून नाव हटवता येते - कोर्ट

याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंह यांनी म्हटले की, हे एक असे प्रकरण असेल, ज्यात वडिलांनी मुलाला सोडून दिले आहे. अशा स्थितीत मुलाच्या पासपोर्टवरून वडिलांचे नाव हटवले जावे आणि वडिलांच्या नावाशिवाय अल्पवयीन मुलाला पासपोर्ट जारी केला जावा.

काही विशिष्ट परिस्थितीत जैविक पित्याचे नाव हटवले जाऊ शकते आणि आडनाव बदलता येते असे दिल्ली हायकोर्टाने सांगितले.

आईने याचिकेत म्हटले- पासपोर्ट अधिकाऱ्यांकडून वडिलांच्या नावासाठी दबाव नको

एकल मातेने याचिकेत म्हटले होते की, ती एकल पालक आहे आणि वडिलांनी मुलाला जन्माआधीच सोडले होते. त्यामुळे पासपोर्ट अधिकाऱ्यांकडून वडिलांच्या नावावर जोर दिला जाऊ नये.