आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनामुळे देशभरात चर्चेत आलेली शाहीन बाग आज पुन्हा एकदा गदारोळात सापडली आहे. त्याचे कारण आहे, एमसीडीचा बुलडोझर… आज याठिकाणाहून अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी एमसीडीचे बुलडोझर शाहीन बागेत पोहोचताच नागरिकांनी गोंधळ सुरू केला.लोकांनी विरोध केल्यानंतर MCD चे बुलडोझर दुपारी 12.30 च्या सुमारास परत गेले. यानंतर लोकांनी येथे तिरंगा फडकावला.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी म्हणजेच सीपीआयएमने शाहीन बागमधील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला असून, कोर्टाने म्हटले आहे की, ही याचिका राजकीय पक्षाने दाखल केली होती आणि कोणत्याही पीडित पक्षाने नाही. या सगळ्यासाठी न्यायालयाला मंच बनवू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. या मोहिमेमुळे बाधित झालेल्या लोकांना उच्च न्यायालयात जाण्यास न्यायालयाने सांगितले आहे.
पोलिस बंदोबस्त नसल्याने कारवाई थांबवण्यात आली
पोलिस बंदोबस्त न मिळाल्याने सोमवारी अतिक्रमण हटाव कारवाई सुरू करण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती, मात्र रात्री 10.30 च्या सुमारास दिल्ली पोलिसांनी फौजफाटा देण्याचे मान्य केले. यानंतर 11 वाजण्याच्या सुमारास एमसीडीचे बुलडोझर शाहीनबागच्या मुख्य रस्त्यावर आले.
महिला बुलडोझरवर चढल्या, रस्त्यावर ठिय्या मांडला
सोमवारी लोकांनी बुलडोझरसमोर ठिय्या मांडून कारवाईचा निषेध केला. काही महिला बुलडोझरवर चढल्या. त्याचबरोबर काही ठिकाणी लोक रस्त्यावरच धरणे धरून बसले. गोंधळ वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी लोकांना तेथून हटवले. काही लोकांना ताब्यातही घेण्यात आले. असे असतानाही कारवाईला विरोध सुरूच होता. आंदोलनानंतर अधिकाऱ्यांनी सध्या अतिक्रमण हटाव कारवाई थांबवल्याचे सांगितले. शाहीन बागेत बुलडोझरच्या उपस्थितीत निर्माण झालेली परिस्थिती या छायाचित्रांच्या माध्यमातून जाणून घेऊया...
पोलिस बंदोबस्त नसल्याने कारवाई थांबवण्यात आली
पोलिस बंदोबस्त नसल्याने सोमवारी अतिक्रमण हटाव कारवाई सुरू होण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती, मात्र 10.30 च्या सुमारास दिल्ली पोलिसांनी फौजफाटा देण्याचे मान्य केले. त्यानंतर सकाळी 11 च्या सुमारास एमसीडीचा बुलडोझर शाहीन बागेवर पोहोचले.
कुठे होणार तोडक कारवाई
दिल्ली पोलिसांकडून बळ मिळाल्यानंतर दक्षिण दिल्ली एमसीडीने पुढील 5 दिवस अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची तयारी केली आहे. त्यानुसार आज म्हणजेच 9 मे रोजी दिल्लीतील शाहीन बाग परिसरात अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे.
जहांगीरपुरीत एमसीडीचा बुलडोझरची कारवाई थांबवण्यात आली
यापुर्वी, जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीला झालेल्या हिंसाचारानंतर तेथील अतिक्रमणही बुलडोझरने हटवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आल्याने ही कारवाई फार काळ चालू शकली नाही. सध्या जहांगीरपुरीतील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.