आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Delhi Police Arrested Freelance Journalist Rajiv Sharma, Who Give Indian Army Related Information To China

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनसाठी हेरगिरी:पत्रकार राजीव शर्मासह 3 अटकेत, भारताच्या संरक्षण खात्याबाबतचे गोपनीय दस्तऐवज जप्त

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अटक केलेल्यांत चीनची एक महिला, एका नेपाळी नागरिकाचाही समावेश

चीनसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपात दिल्ली पोलिसांनी स्वतंत्र पत्रकार राजीव शर्मा याच्यासह तीन जणांना अटक केली आहे. शासकीय गोपनीयता कायद्यांतर्गत पत्रकारासह अटक केलेल्या इतर दोघांत चीनची एक महिला आणि नेपाळचा एक नागरिक आहे. शर्माने चीनच्या गुप्तचरांना भारताची संवेदनशील माहिती पुरवल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सीमेबाबत भारताची रणनीती, लष्कराची तैनाती आणि रसदेबाबत त्याने अत्यंत संवेदनशील माहिती चीनच्या गुप्तचर संस्थांना पुरवली होती. तो ईमेल व सोशल मीडिया अकाउंटद्वारे ही माहिती देत होता. या प्रकरणात कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसे देण्याच्या आरोपात चिनी महिला आणि तिच्या नेपाळी सहकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सध्या त्यांची कसून चौकशी केली जात आहे. कोर्टाने त्याना ६ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

प्रत्येक माहितीसाठी ७३ हजार रुपये, दीड वर्षात ४० लाख मिळाले
- स्पेशल सेलचे डीसीपी संजीवकुमार यादव म्हणाले, संरक्षणाच्या विषयांवर अनेक माध्यम संस्थांसह चीनचे सरकारी मुखपत्र ग्लोबल टाइम्समध्येही शर्माचे लेख प्रकाशित झाले आहे. शर्मा चीनच्या गुप्तचरांसोबत २०१६ पासून संपर्कात होता. त्याच्या चिनी गुप्तहेर अधिकाऱ्यांसोबतच्या संपर्काचाही भांडाफोड झाला आहे.
- पोलिसांच्या दाव्यानुसार, शर्माला एक माहिती पुरवण्यासाठी सुमारे १ हजार डॉलर्स म्हणजेच ७३ हजार रुपये मिळायचे. दीड वर्षात हेरगिरीसाठी त्याला ४० लाख रुपये मिळाले आहेत.
- केंद्रीय तपास संस्थांकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारावरून पत्रकाराला १४ सप्टेंबरला अटक झाली . दिल्लीतील त्याच्या घरातून संरक्षणविषयक अनेक दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...