आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Delhi Police On FIR Against Greta FIR Does Not Name Anyone, Toolkit Maker Charged

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ ग्रेटा थनबर्ग:ग्रेटाविरूद्धच्या खटल्यावर दिल्ली पोलिस म्हणाले - FIR मध्ये कोणाचेही नाव लिहिले नाही, टूलकिट बनवणाऱ्यावर दाखल केला गुन्हा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वीडनची पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने गुरुवारी (भारतीय वेळेनुसार) पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. कोणतीही धमकी किंवा द्वेष तिला बदलू शकत नाही. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ग्रेटाविरोदात गुन्हा दाखल केल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र दिल्ली पोलिसांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. विशेष पोलिस आयुक्त प्रवीर रंजन यांनी गुरुवारी सांगितले की एफआयआरमध्ये कोणाचेही नाव लिहिलेले नाही. हा गुन्हा केवळ टूल किट बनवणाऱ्यांविरोधात नोंदविण्यात आला आहे आणि हा सध्या तपासाचा विषय आहे, असे ते म्हणाले.

ग्रेटा थनबर्गने बुधवारी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये शेतकरी आंदोलनाला समर्थन दिले होते. तिने पोस्ट करत टूलकिट शेअर केली होती. यामध्ये 26 जानेवारीला दिल्लीत झालेल्या प्रदर्शनाविषीय माहिती शेअर करण्यात आली होती. यानंतर ट्विटरने या डॉक्युमेंटवर बंदी आणत ग्रेटाचे ते ट्विट डिलीट केले होते.

बातम्या आणखी आहेत...