आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये पोलिसांनी एका महिलेला अनेक वेळा चापटा मारल्या. या घटनेचा व्हिडिओ आपचे आमदार संदीप झा यांनी शेअर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हिडिओ 31 डिसेंबरच्या रात्री उशिराचा असल्याचे सांगण्यात येत आहे. आमदाराने ट्विट करून म्हटले आहे की, SHO स्वतः एका मुलीला थापड मारत आहे. अशा परिस्थितीत पोलीस महिलांचे संरक्षण कसे करणार? एसएचओवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तरुणाला वाचवण्यासाठी हात पकडला, तर महिलेला मारली चापट
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक पोलिस अधिकारी आधीच रस्त्यावर उभा आहे. पाठोपाठ एक तरुण आणि तरुणीसह अनेक पोलिस मागून येत आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने तरुणाला मारण्यासाठी हात वर करताच एका महिलेने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. अचानक एसएचओ मागे वळून महिलेला ओढतो आणि तिला 2 चापटा मारतो.
यानंतर मागे उभा असलेला दुसरा पोलिसही महिलेला थप्पड मारू लागतो आणि तिला मागे ढकलतो. नंतर ती महिला परत येते आणि पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करते. पोलिस शेजारी उभ्या असलेल्या तरुणाला घेऊन जात असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. काही लोक थांबण्याचा प्रयत्न करतात, पण पोलीस थांबत नाहीत.
पोलिसांनी सांगितले- परिसरात गोंधळ करत होते, आम्हालाही शिवीगाळ केली
या घटनेबाबत पोलिसांचे म्हणणे समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, 12.30च्या सुमारास जहांगीरपुरीच्या एच ब्लॉकमधील सार्वजनिक ठिकाणी काही लोक गोंधळ घालत होते. काही जणांनी दारूही प्राशन केली होती. पोलिसांनी त्यांना निघून जाण्यास सांगितले असता त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्या लोकांमध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश होता. महिलेने एएसआयची कॉलर ओढली, त्याला थप्पड मारली आणि अनेक पोलिसांनाही मारहाण केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.