आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Delhi Police Special Cell Arrested Two Accused Of Khalistani Flag Hosting At DC Office Moga

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खालिस्तानी समर्थक ताब्यात:14 ऑगस्टला पंजाबमधील पोलिस कार्यलयावरील भारतीय झेंडा काढून खलिस्तानी झेंडा फडकावणाऱ्या दोघांना दिल्लीतून अटक

मोगा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घटनेतील मास्टरमाइंड पंजाब पोलिसातील अधिकाऱ्याचा मुलगा आहे

मोगातील कमिश्नर ऑफिसवर खालिस्तानी झेंडा फडकवणाऱ्या दोन खालिस्तानी समर्थकांना दिल्लीतून अटक करण्यात आले आहे. दोघे 16 दिवसांपासून फरार होते. स्पेशल पोलिस टीमने त्यांना परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेतले आहे. जसपाल सिंग आणि इंद्रजीत सिंग अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. जसपाल घटनेचा मास्टरमाइंड असून, त्याचे पडील पंजाब पोलिसातील अधिकारी आहेत. दोन्ही आरोपींचे बंदी घातलेल्या काही शिख संघटनांशी संबंध असल्याचेही समोर आले आहे.

गुरपतवंत सिंगच्या घोषणेने प्रभावित झाले

खालिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने स्वातंत्र्यदिनी आपल्या समर्थकांना खालिस्तानी झेंडा फडकवण्यास प्रोत्साहीत केले होते. त्याने घोषणा केली की, 15 ऑगस्टला खलिस्तानी झेंडा फडकवणाऱ्या व्यक्तीला सवा लाख डॉलरचे बक्षीस दिले जाईल. तसेच, कोणी सरकारी कार्यलयावर खलिस्तानी झेंडा फडकवल्यास त्याला अडीच लाख डॉलर दिली जातील. यावरुन प्रभावित होऊन आरोपींनी खालिस्तानी झेंडा तयार करुन घेतला.

भारतीय राष्ट्रध्वज काढून खलिस्तानी झेंडा फडकवला

जसपाल आणि इंद्रजीत 14 ऑगस्टच्या सकाळी 8 वाजता कमिश्नर ऑफिसमध्ये घुसले. त्यांनी या कटातील तिसरा आरोपी आकाशदीपलाही आपल्या सोबत घेतले. तिघांनी कमिश्नर ऑफिसच्या चौथ्या मजल्यावरील भारतीय ध्वज काढून खलिस्तानचा केशरी झेंडा फडकवला. झेंड्यावर शिखांचे पवित्र निशान खंडा काढलेले होते. तसेच, यावर खालिस्तान जिंदाबाददेखील लिहीले होते. यानंतर आरोपींनी घटनेचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला होता.