आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Delhi Police Special Cell Delhi Police Arrested Two Militants Who Are Residents Of Jammu And Kashmir.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला:दिल्लीमधून जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक, महत्त्वपूर्ण ठिकाण आणि VIP होते निशाण्यावर

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे लतीफ मीर आणि अशरफ खटाना असे सांगितले जात आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सोमवारी रात्री दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. दोघांजवळ काही महत्त्वाची दस्तावेज आणि विस्फोटक मिळाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अटक करण्यात आलेले दोन्ही दहशतादी हे दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधीत होते. हे जम्मू-कश्मीरच्या बारामुला येथे राहणारे आहेत. पोलिस यांची चौकशी करत आहेत.

कशी झाली अटक
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजेंस विंगला सराय काले खांमध्ये काही संशयीत लोक उपस्थित असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर त्यांच्यावर नजर ठेवली जात होती. सोमवारी रात्री माहितीच्या आधारावर स्पेशल सेलच्या टीमने कारवाई करत दोन्ही दहशतवाद्यांना अटक केली. यांच्याजवळ काही संवेदनशील दस्तावेज आणि विस्फोटक सापडले आहेत. रिपोर्टनुसार, दोन्ही दहशतवाद्यांजवळ दो सेमी ऑटोमॅटिक पिस्टल आणि 10 जिवंत काडतूस आढळले आहेत.

अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे लतीफ मीर आणि अशरफ खटाना असे सांगितले जात आहे. एक दहशतवादी बारामुला तर दुसरा कुपवाडा येथे राहणारा आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार, दोन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधीत आहेत आणि दिल्लीमध्येही यांचे कनेक्शन आहे. यांच्या निशान्यावर राष्ट्रीय राजधानीचे प्रमुख स्थळे आणि VIP होते. दोघांची चौकशी सुरू आहे.

ऑगस्टमध्येही दिल्ली पोलिसांनी आयएसच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. यांच्याजवळून आयडी हस्तगत करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...