आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi Police Special Cell Interrogate Twitter India MD Manish Maheshwari On May 31 In Congress Toolkit Case; News And Live Updates

मारहाणीच्या व्हिडिओवरून खळबळ:अभिनेत्री स्वरा भास्कर आणि पत्रकार आरफा खानम शेरवाणी यांच्याविरोधात तक्रार दाखल; प्रक्षोभक ट्विटचा आरोप

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्विटर इंडियाचे प्रमुख मनीष माहेश्वरीसह अनेक लोकांवर तकार दाखल करण्यात आली आहे

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एका मुस्लिम वृद्धाच्या मारहाणीच्या व्हायरल व्हिडियोवरुन वाद वाढतच जात आहे. संबंधित प्रकरणात अभिनेत्री स्वरा भास्कर आण‍ि ट्विटर इंडियाचे प्रमुख मनीष माहेश्वरीसह अनेक लोकांवर तकार दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार दिल्ली येथील टिळक मार्ग पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली गेली असून संबंधितांवर प्रक्षोभक ट्विट केल्याचा आरोप आहे.

ही तक्रार वकील अमित आचार्य यांनी दाखल केली आहे. यामध्ये पत्रकार आरफा खानम शेरवाणी यांचादेखील समावेश आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, आतापर्यंत संबंधित व्यक्तींवर एफआयआर दाखल करण्यात आले नसून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्वरा भास्करने एफआयआरवर प्रश्न उपस्थित केले
अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी ट्विटरवर लिहिले की, 'गाझियाबाद लिंचिंग पीडिताचा कौटुंबिक व्यवसाय सुतारकाम आहे. त्यांना ताईत बनविण्याविषयी काहीही माहित नाही. अटक केलेल्या सह आरोपीचा भाऊही पोलिसांच्या वक्तव्याला आव्हान देत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी केली गेली पाहिजे.'

त्यांनी पुढे लिहिले की, '6 जून रोजी केलेल्या लेखी तक्रारीच्या मूळ प्रतिमध्ये याची पुष्टी कुटुंबाने केली होती. मात्र, पोलिसांनी याची खातरजमा केली नाही. सीलवर लिहलेल्या तारीख दर्शवते की, एफआयआरच्या आधी तिच्या हल्लेखोरांनी सैफीवर 'जय श्री राम' बोलण्याचा आरोप पोलिसांच्या निदर्शनास आणला होता.'

रिपोर्टिंगवर गुन्हा नोंदविण्याचा प्रयत्न - आरफा
पत्रकार आरफा खानम शेरवाणी यांनी ट्विटरवर लिहले की, 'संबंधित घटनेत केलेल्या बातमीला गुन्हेगारी वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय. बातमी सोडून आरोपीने यावर काही म्हटले आहे का? या बातमीच्या वृत्तामुळे दी वायरवर एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

3 मुद्द्यात समजून घ्या - गाझियाबादमध्ये काय झाले?

  • उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये अब्दुल समद नावाच्या एका वृद्ध व्यक्तीवर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी ट्विटरसह 9 जणांवर एफआयआर दाखल केली होती. या घटनेला चुकीच्या पद्धतीने जातीय रंग दिल्यामुळे या सर्वांवर ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका वयोवृद्ध मुस्लिमांना मारहाण करत दाढी कापण्यात आली होती.
  • पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणाची सत्य संपूर्णपणे वेगळे आहे. पीडित वृद्ध व्यक्तीने आरोपीला काही ताईत दिली होती, परंतु, आरोपीला याचे निकाल न मिळाल्यामुळे ते संतप्त झाले आण‍ि त्यांनी त्‍या वृद्धाला मारहाण केली असे पोलिसांचे म्हणणे आहे. ते पुढे म्हणाले की, ट्विटरने या व्हिडिओला "मॅनिपुलेटेड मीडिया" म्हणून टॅग केले नाही. पीडितने आपल्या एफआयआरमध्ये जय श्री रामच्या घोषणा आण‍ि दाढी कापण्याचे नोंद केलेली नाही, असेही पोलिसांनी म्हटले.
  • संबंधित प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांच्यामध्ये अय्यूब आणि नकवी हे पत्रकार आहेत. तर जुबैर हे फॅक्ट चेकिंग न्यूज ऑल्टचे लेखक आहेत. डॉ शमा मोहम्मद आणि निजामी हे कॉंग्रेसचे नेते आहेत. अलिगड मुस्लिम विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष उस्मानी यांचादेखील समावेश करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...