आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्दयी:दिल्लीत गरोदर महिलेची शेजाऱ्याने केली हत्या, DJ वाजण्यास नकार दिल्याने झाडली गोळी, जन्माआधीच बाळही ठार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीत डीजे वाजवण्यास विरोध केल्याने शेजाऱ्याने गर्भवती महिलेवर गोळ्या झाडल्या. कुटुंबीयांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले, तेथे महिलेचा गर्भपात झाला. रविवारी उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

महिलेच्या मानेवर लागली होती गोळी
हे प्रकरण दिल्लीतील सिरासपूर भागातील आहे. पोलिसांनी सांगितले की, 3 एप्रिल रोजी येथे राहणाऱ्या हरीशच्या घरी पार्टी होती. त्यांच्या घरी डीजे वाजत होता. शेजारी राहणाऱ्या 8 महिन्यांची गरोदर असलेल्या रंजू यांनी डीजेच्या आवाजावर आक्षेप घेतला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात हरीशने रंजूवर गोळी झाडली, जी तिच्या मानेला लागली. कुटुंबीयांनी महिलेला मॅक्स रुग्णालयात दाखल केले. येथे महिलेचा गर्भपात झाला. उपचारादरम्यान रविवारी 9 एप्रिलला तिचा मृत्यू झाला.

भावजयीच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल

दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 3 एप्रिल रोजी एका महिलेला शेजाऱ्याने गोळ्या घातल्याची माहिती मिळाली. मानेला गोळी लागल्याने ती महिला जवाब देण्याच्या स्थितीत नव्हती. घटनेच्या वेळी तिची भावजय घटनास्थळी उपस्थित होती. त्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मृत महिला बिहारची राहणारी
रविवारी रुग्णालयातून महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली. ही महिला बिहारची रहिवासी आहे. तिचे पती दिल्लीत मजूर काम करतात. या ठिकाणी ते भाड्याने खोली करून राहत असत.

हरीशने मित्राच्या बंदूकीतून गोळी झाडली
हरीशने मित्र अमित याची लायसन्स असलेल्या बंदुकीतून रंजूवर गोळी झाडली. आरोपी हरीश हा डिलिव्हरी बॉय असून अमित मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात काम करतो. पोलिसांनी हरीश आणि अमितला अटक केली आहे. यापूर्वी पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा प्रयत्न या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. महिलेच्या मृत्यूनंतर या प्रकरणात खुनाचे कलमही जोडण्यात आले आहे.