आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीत शुक्रवारी रात्री सुरू झालेल्या पावसामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. 46 वर्षांनी इथे एवढा पाऊस झाला आहे. मोतीबाग, आर के पुरमसह दक्षिण दिल्लीच्या अनेक भागात रस्ते जलमय झाले असून येथून ये -जा करणाऱ्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरही पावसाचे पाणी साचले आहे. यानंतर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये एक व्हिडिओ 2 ते 3 वर्ष जुना होता. ज्याला या वर्षाचे सांगून व्हायरल केला. या व्हिडिओमध्ये विमानतळाच्या आवारात पावसाचे पाणी दाखवण्यात आले. मात्र, पावसाच्या पाण्याने विमानतळाची धावपट्टी भरली, ज्यामुळे पार्किंगच्या परिसरात उभ्या असलेल्या विमानाची चाके त्यात बुडाली.
मशीनमधून काढले जातेय पाणी
विमानतळ प्राधिकरणाने सांगितले की एक आंतरराष्ट्रीय आणि चार देशांतर्गत उड्डाणे जयपूर आणि अहमदाबाद विमानतळांकडे वळवण्यात आली आहेत. दिल्ली सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांनी सांगितले, की ज्या भागात पाणी साचण्याची समस्या समोर आली आहे, तेथे मशीनद्वारे पाणी काढले जात आहे.
18 वर्षांचा मोडला विक्रम
दिल्लीत एकीकडे पावसाने 18 वर्षांचा विक्रम मोडला तर दुसरीकडे 46 वर्षातील सर्वाधिक पावसाचा विक्रमही केला. 1 जूनपासून येथे मान्सून सुरू होतो. संपूर्ण पावसाळ्यात सरासरी पाऊस 649.8 मिमी आहे. 1 जून ते 10 सप्टेंबर पर्यंत सरासरी 586.4 मिमी पाऊस पडतो. यावेळी 10 सप्टेंबर रोजी हा आकडा 1005.3 वर पोहोचला.
शनिवारपर्यंत दिल्लीत 1100 मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वी 2003 मध्ये 1050 मिमी पाऊस झाला होता. हा विक्रमही यंदा मोडला गेला. 1975 मध्ये दिल्लीत 1150 मिमी पावसाची नोंद झाली होती. जर पाऊस असाच सुरू राहिला, तर हा 46 वर्षांचा रेकॉर्डही मोडला जाऊ शकतो.
दिल्ली-एनसीआरच्या या भागात रेड अलर्ट
हवामान विभागाने दिल्लीत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे, ज्याचा परिणाम बहादूरगढ, गुरुग्राम, लोनी देहात, हिंडन एअर फोर्स स्टेशन, गाझियाबाद, इंदिरापुरम, छपराउला, चरखी दादरी, मट्टनहेल, झझार, सोनीपत, रोहतक, मोदीनगर, हापूर, दिल्ली एनसीआर. बागपत भागांसाठी आहे.
या भागात साचले पाणी
मधु विहार, हरी नगर, रोहतक रोड, बदरपूर, सोम विहार, आयपी स्टेशन जवळ रिंग रोड, विकास मार्ग, संगम विहार, मेहरौली-मदारपूर रोड, पुल प्रल्हादपूर अंडरपास, मुनारिका, राजपूर खुर्द, नांगोली आणि किरारी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.