आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Delhi Red Fort Tractor Rally Violence Latest Updates In Photos; Farmers Protest (Kisan Andolan) On Republic Day

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंसाचारानंतर लाल किल्ल्याचे 10 फोटो:हिंसा पसरवणाऱ्यांनी तिकीट काउंटरपासून बाथरुमपर्यंत केली होती तोडफोड; CCTV ही फोडून बाहेर फेकले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंसा करणाऱ्यांनी आत प्रवेश करताच सर्वात पहिले CCTV ला निशाणा बनवले

26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराचे फोटो समोर येत आहेत. हिंसा करणाऱ्यांनी लाल किल्ल्याच्या तिकीट काउंटरपासून आतील ऑफिस आणि बाथरुमचीही तोडफोड केली आहे. खुर्च्या, टेबल सर्व तोडून टाकले आहेत. ऑफिसमधील फाइल अस्ताव्यस्त पडल्या आहेत. आत उभ्या CISF च्या गाडीचीही अवस्था अपघात झाल्यासारखी केली आहे. हिंसा करणाऱ्यांनी आत प्रवेश करताच सर्वात पहिले CCTV ला निशाणा बनवले. रिपोर्ट्सनुसार, आतील सर्व CCTV कॅमेरे तोडण्यात आले आहेत.

लाल किल्ल्याच्या तिकीट काउंटरला निशाणा बनवण्यात आले. आत लावलेले ग्लास कव्हरही आंदोकलांनी तोडले. पंखेही ओढून तोडण्यात आले आहेत.

केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल लाल किल्ल्यात पोहोचले. त्यांनी अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. नुकसानचा रिपोर्ट तयार करण्याचा आदेश दिला आहे. पर्यटन मंत्र्यांनी विभागीय तपासाचे आदेशही दिले आहेत.

गॅलरीमध्ये लावलेल्या जाळीलाही नुकसान पोहोचवण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी हिंसा पसरवणाऱ्यांविरोधात विविध कलमांअंतरर्गत गुन्हा दाखल केला आहे.

लाल किल्ल्याच्या कार्यालयात ठेवलेल्या फाइलही बाहेर फेकण्यात आल्या आहेत. आता पर्यटन विभाग आणि लाल किल्ल्याचे प्रशासकीय अधिकारी फाइल रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

लाल किल्ल्याच्या खिडक्यांचे ग्लासही आंदोलकांनी तोडले आहेत. पर्यटन विभाग संपूर्ण नुकसानीचा हिशोब करत आहेत.

लाल किल्ल्याच्या एंट्री गेटवर झाली तोडफोड. लगेज स्कॅनरही तोडण्यात आले.

लाल किल्ल्यामध्ये लावण्यात आलेले अनेक CCTV हिंसा करणाऱ्यांनी तोडले आहेत. असे सांगितले जात आहे की, हिंसक पूर्ण तयारीने आले होते. पोलिस आता उर्वरित CCTV वरुन फुटेज तपासत आहे.

बुधवारी घटनास्थळी मोठ्या संख्येत सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले. पोलिसांसोबत आता रॅपिड अॅक्शन फोर्सचे जावनांनीही मोर्चा सांभाळला आहे.

किल्ल्याच्या खोल्यांमध्ये ठिकठिकाणी सामान पसरले आहे. पर्यटन विभागाकडून आता स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...