आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi Riot ; Accused Natasha, Dewangana And Asif Granted Bail; Delhi High Court's Decision Addressing The Government

दिल्ली दंगल:आरोपी नताशा,देवांगना व आसिफला जामीन; सरकारची कानउघाडणी करत दिल्ली हायकोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली दंगलीशी संबंधित प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने आरोपी विद्यार्थी-विद्यार्थिनींना मंगळवारी जामीन मंजूर केला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) नताशा नरवाल आणि देवांगना कलिता तसेच जामिया मिलिया इस्लामियाचा आसिफ इक्बाल ‘तन्हा’ हे आरोपी आहेत.

न्या. सिद्धार्थ मृदुल आणि अनुप जे. भंभानी यांच्या पीठाने जामीन याचिकांवर सुनावणी केली. कोर्ट म्हणाले, “असे दिसते की सरकारसाठी विरोधाचा घटनात्मक अधिकार आणि अतिरेकी कारवाया यांच्यातील अंतर धूसर होत चालले आहे. ही मानसिकता प्रचलित झाली तर हा लोकशाहीसाठी वाईट दिवस असेल.’

कोर्ट म्हणाले, “सरकार वाहतुकीची समस्या व गांेधळापासून वाचण्यासाठी रस्त्यांवर सार्वजनिक सभा आणि निदर्शनांवर बंदी आणू शकते. मात्र या सभांसाठी सर्व रस्ते किंवा पटांगणे सुरू वा बंद करू शकत नाही. हे घटनेतील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.’

बातम्या आणखी आहेत...