आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या वर्षी ईशान्य दिल्लीतील दंगलींशी संबंधित एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांवर 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे. घोंडा येथील रहिवाशाच्या अपीलवर हायकोर्टाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते. या व्यक्तीने असे सांगितले होते की दंगलीच्या वेळी त्याच्या डोळ्यामध्ये गोळी लागली होती. एफआयआर नोंदवण्याच्या आदेशाला दिल्ली पोलिसांनी विरोध केला होता.
आपले घटनात्मक कर्तव्य बजावण्यात अधिकारी अयशस्वी: कोर्ट
याप्रकरणी उच्च न्यायालयाने बुधवारी दिल्ली पोलिसांना फटकारले आहे. हायकोर्टाने म्हटले आहे की, ' असे दिसतेय की, पोलिसांनी वेगळ्या एफआयआरमध्ये आरोपींना वाचवण्यासाठी मार्ग बनवला आणि खेदजनक म्हणजेच पोलिस अधिकारी आपल्या तपासादरम्यान घटनात्मक कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरले आहेत'
सीएएविरोधी निषेधांदरम्यान गेल्या वर्षी 24 फेब्रुवारी रोजी ईशान्य दिल्लीत दंगल उसळली होती. यामध्ये 53 लोक मरण पावले आणि 200 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी 751 एफआयआर नोंदवल्या आहेत.
उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिस आयुक्तांना म्हटले - सुधारणेसाठी पावले उचला
दिल्ली उच्च न्यायालयाने भजनपुरा पोलिसांवर दंड ठोठावला आहे. हे दंड एसएचओ आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठोठावण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विनोद यादव यांनीही या आदेशाची प्रत पोलिस आयुक्तांना पाठवली आहे. ते म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी आणि देखरेखीचा स्तर पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास आला पाहिजे. पोलिस तपास हास्यास्पद होता. कोर्टाने पोलिस आयुक्तांना या प्रकरणाच्या दृष्टीने सुधारात्मक पावले उचलण्यास सांगितले.
24 तासांत एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते
ऑक्टोबर 2020 मध्ये मेट्रोपॉलिटन दंडाधिका-यांनी दिल्ली पोलिसांना सांगितले की मो. नासिर यांच्या तक्रारीवरून 24 तासांच्या आत एफआयआर नोंदवण्यात यावा. 24 फेब्रुवारी 2020 रोजी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता, असे नासिर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते. एक गोळी त्याच्या डाव्या डोळ्याला लागली होती. आपल्या तक्रारीत नासिर यांनी नरेश त्यागी, सुभाष त्यागी, उत्तम त्यागी, सुशील, नरेश गौर आणि इतरांना आरोपी बनवले होते. असे असूनही एफआयआर नोंदवण्यात आला नाही तेव्हा नासिर कोर्टात पोहोचले.
कोर्टाने पोलिसांच्या कमतरता सांगितल्या
एएसजे विनोद यादव यांनी आपल्या आदेशात म्हटले की, 24 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी उत्तर घोंडा येथे नासिरसोबत घटना घडली होती, परंतु मोहनपूर, मौजपूरच्या संदर्भात दिल्ली पोलिसांनी 25 फेब्रुवारी रोजी एफआयआर नोंदवला.
कोर्टाने असेही म्हटले आहे की गोळी लागल्यामुळे जखमी झालेल्या 7 जणांची चौकशी एजन्सीला माहिती होती, परंतु तरीही एफआयआर नोंदवताना आयपीसीच्या कलम 307 आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 25 लावण्यात आली नाही.
पोलिसांनी सांगितले होते की- FIR आधीच नोंदवला आहे
कोर्टात पोलिसांनी म्हटले होते की दिल्ली दंगली प्रकरणात यापूर्वीच एफआयआर नोंदवला गेला आहे. यामध्ये नासिरशिवाय इतर 6 लोकही जखमी झाल्याची माहिती आहे. ज्यांच्या नावांचा उल्लेख नासिर यांनी केला आहे त्याच्याविरूद्ध कोणताही पुरावा मिळालेला नाही. नरेश आणि उत्तम त्यावेळी दिल्लीत नव्हते आणि सुशील त्याच्या ऑफिसमध्ये होता.
नासिरचे वकील महमूद प्राचा यांनी कोर्टाला म्हटले होते की, दिल्ली पोलिसांनी जो एफआयआर दाखल केला आहे, त्यामध्ये नासिरच्या तक्रारीवर लक्ष देण्यात येत नाहीये. प्राचा म्हणाले होते की, नासिरच्या तक्रारीवर वेगळा एफआयआर दाखल करायला हवा. कारण सुपीम कोर्टाने यावर कायदा बनवला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.