आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली हिंसाचार प्रकरणात चार्जशीट दाखल:25 वॉट्सअॅप ग्रुपद्वारे दंगेखोरांना दिले जात होते निर्देश ; हिंसाचारासाठी खास ग्रुप बनवण्यात आला

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 10 हजार पानांच्या चार्जशीटमध्ये अद्याप शरजील इमाम आणि उमर खालिदचे नाव नाही, त्यांचे नाव सप्लीमेंट्री चार्जशीटमध्ये येतील

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बुधवारी दिल्ली दंगलप्रकरणी 15 आरोपींविरोधात 10 हजार पानांची चार्जशीट कडकडडूमा कोर्टात दाखल केली आहे. यानुसार, व्हॉट्सअॅप ग्रुप आणि चॅटद्वारे हिंसा भडकवण्याचा कट रचण्यात आला होता. पुराव्यांसाठी 24 फेब्रुवारीच्या व्हॉट्सअॅप चॅटलाही सामील करण्यात आले.याच दिवशी हिंसाचार झाला होता.

चार्जशीटमध्ये सांगितले की, कट रचणारा मुख्य आरोपी आंदोलकांना निर्देश देत होता. प्रत्येक ठिकाणी हिंसा भडकवण्यासाठी 25 व्हॉट्सअॅप ग्रुप बनवले होते. पोलिसांनी प्रत्येक ग्रुपची तपासणी केली आहे.

चार्जशीटमध्ये उमर खालिद आणि शरजील इमामचे नाव अद्याप आलेले नाही. दोघांना नुकतंच अटक करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची नावे सप्लीमेंट्री चार्जशीटमध्ये सामील केले जातील.

चार्जशीटमध्ये यांचे नाव सामील

चार्जशीटमध्ये आम आदमी पार्टीचा निलंबित नेता ताहिर हुसैन, पिंजरा तोडणारा कार्यकर्ता देवांगना कलिता आणि नताशा नरवाल, पीएफआय नेता परवेज अहमद आणि मोहम्मद इलियाज, कार्यकर्ता सैफी खालिद, माजी वकील इशरत जहां, जामियाचे विद्यार्थी आसिफ इकबाल, मीरन हैदर आणि सफूरा जरगर, शादाब अहमद आणि तस्लीम अहमदचे नाव सामील आहे. सर्वांना अनलॉफुल अॅक्टिविटी (प्रिवेंशन) अॅक्ट (यूएपीए), आयपीसी आणि आर्म्स अॅक्टअंतर्गत आरोपी ठरवण्यात आले आहे.

दिल्ली हिंसाचारात 53 जणांचा मृत्यू झाला होता

सीएएविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये 24 फेब्रुवारीला हिंसा भडकली होती. यात 53 जणांचा मृत्यू झाला होता, तर 200 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी 751 एफआयआर दाखल केल्या होत्या.