आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली हिंसाचार:व्हॉट्सअॅप समूहांच्याकटात हाेते विराेधी सूर, आराेपपत्रातील दावा

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 10 व्हॉट्सअॅप ग्रुप होते सामील

आराेपपत्रात सामील एका आराेपीच्या जबाबानुसार १६-१७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री चांदबागमध्ये एक गुप्त बैठक झाली हाेती. ही बैठक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीचे निश्चित झाल्यानंतर घेण्यात आली.

बैठकीत आराेपी अतहर याच्याशिवाय गुलफिशा, नताशा, दवांगना, सलीम मलिक व इतरांचा समावेश हाेता. बैठकीत आेवेस सुलतानला बाेलावण्यात आले नव्हते. परंतु ताे बैठकीत सहभागी झाला हाेता, असे आराेपपत्रात नमूद करण्यात आले आहे. सरकारला झुकवायचे आहे. त्यासाठी काहीही करायची तयारी आहे, असे बैठकीत सहभागी लाेकांचे म्हणणे हाेते. अतहरच्या जबाबानुसार बैठक सुरू असताना गुलफिशा म्हणाली, आंदाेलनाला पुढच्या टप्प्यापर्यंत नेण्याची हीच याेग्य वेळ आहे. दिल्लीत चक्काजामची रणनीती अवलंबली जाईल. आधी चक्का जाम हाेईल आणि त्यानंतर हिंसक निदर्शनाच्या पातळीपर्यंत ते नेले जाईल, असे तिने म्हटल्याचे जबाबात आहे. परंतु या मुद्याला आेवेस सुलतानने विराेध केला हाेता. असे काही केल्यास लाेकांची अडचण वाढेल. हिंसाचार व दंगल भडकेल, असा इशारा त्याने दिला. अन्य एका व्यक्तीने थाेडीफार हिंसा चालते, असे सांगितले. एवढेच नव्हे तर निदर्शकांना लाल मिर्ची पावडर, काठी, दगड साेबत बाळगण्यास सांगण्याचेही ठरले. त्याचा शस्त्रासारखा नंतर वापर करता येईल, असेही ठरले. सुलतानने त्यास विराेध केला हाेता. परंतु सर्वांनी त्यास नकार दिला. आराेपपत्रानुसार सुलतानने डीपीएसजी व्हाॅट्सअॅप ग्रुपमध्ये पुन्हा एकदा या सर्व गाेष्टींना विराेध केला. परंतु सर्वांनी नकार दिला.

१० व्हॉट्सअॅप ग्रुप होते सामील
दिल्ली हिंसाचाराच्या कथित कारस्थानाबद्दल एक दावा करण्यात आला आहे. त्यानुसार १० व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हा कट रचण्यात आला. त्यात जेएनयूचे मुस्लिम विद्यार्थी, जामिया समन्वय समिती (जेसीसी), दिल्ली प्राेटेस्ट सपाेर्ट ग्रुप (डीपीएसजी) यांच्या व्हाॅट्सअॅप ग्रुपचा समावेश आहे. दिल्लीतील घटनेमुळे अनेक दिवस या भागात तणावाची स्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...