आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीच्या रोहिणी कोर्टात शूटआउट:न्यायालयात हजर राहण्यासाठी आणलेल्या गँगस्टर जीतेंद्र गोगीसह 4 जणांचा मृत्यू, वकीलांच्या कपड्यात आले होते हल्लेखोर; पोलिसांनी 2 जणांना ठार केले

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका हल्लेखोरावर 50 हजारांचे बक्षीस होते

दिल्लीच्या रोहिणी कोर्ट परिसरात शुक्रवारी गँगवॉर झाले. हल्लेखोरांनी गोळी झाडून गँगस्टर जीतेंद्र गोगीची हत्या केली. या गँगवॉरमध्ये गोगीसह एकूण चार जण मारले गेले आहेत. गोळीबारात 3 ते 4 लोक जखमीही झाले. अहवालानुसार गोगी न्यायालयात हजर राहण्यासाठी आला होता. गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अहवालांनुसार, रायवल टिल्लू टोळीचे दोन हल्लोखोर वकिलांच्या कपड्यांमध्ये आले. त्यांनी न्यायालयाच्या खोली क्रमांक 207 मध्ये न्यायाधीश गगनदीप सिंह यांच्यासमोर गोगीवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन्ही हल्लेखोर ठार झाले.

एका हल्लेखोरावर 50 हजारांचे बक्षीस होते
दिल्लीचे पोलिस आयुक्त राकेश अस्थाना म्हणाले की, जेव्हा गुंड गोगीला न्यायालयात सुनावणीसाठी नेण्यात आले, तेव्हा दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना ठार केले. हल्लेखोरांपैकी एकावर 50,000 रुपयांचे बक्षीस होते.

गोगीचा रुग्णालयात झाला मृत्यू
वकील ललित कुमार यांनी सांगितले की, हल्लेखोर वकिलांच्या ड्रेसमध्ये आले होते. त्यांनी गोगीला सलग 3 गोळ्या झाडल्या. गोगीच्या सुरक्षेत असलेल्या दिल्ली पोलिसांच्या लोकांनी 25-30 गोळ्या झाडल्या आहेत. ज्यात गुन्हेगारांचा जागीच मृत्यू झाला. गोगीचा रुग्णालयात मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...