आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Delhi Schools Fees: Manish Sisodia On Delhi Private Schools Fee Over Coronavirus (COVID 19)

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालकांना दिलासा:दिल्ली आणि महाराष्ट्र सरकारने शाळांना फीस न घेण्याच्या सूचना दिल्या; झारखंड सरकारने फी घेणाऱ्यांवर कारवाईचा इशार दिला

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाळांकडून फी वाढ आणि ट्रांसपोर्टसह इतर अनेक चार्ज घेत असल्याचा तक्रारी आल्या होत्या- मनीष सिसोदिया

दिल्ली सरकारने कोरोना संकट आणि लॉकडाउनदरम्यान पालकांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. शुक्रवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, आम्हाला शाळांकडून फी वाढ आणि ट्रांसपोर्टसह इतर चार्ज घेत असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. आता आम्ही निर्णय घेतला आहे की, सरकारी किंवा खासगी शाळा लॉकडाउन संपेपर्यंत पालकांकडून फक्त ट्युशन फी घेईल, याशिवाय इतर कोणताच चार्ज घेतला जाणार नाही. तसेच, त्यांनी सर्व शाळा प्रशानाला आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देण्याचेही आदेश दिले आहेत. 

महाराष्ट्र : शाळांनी फी मागितल्यास कारवाई केली जाईल

महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी म्हटल्या की, लॉकडाउनदरम्या शाळांनी फी मागितल्यास पालक तक्रार दाखल करू शकतील. राज्य सरकारने 30 मार्चलाच सांगितले होते की, लॉकडाउदरम्यान कोणत्याच शिक्षण संस्थांनी फीसाठी पालकांकडून तागादा लावू नये.

शासनाने ही गोष्ट विचारात घेत सर्व बोर्डाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी 2019-20 आणि 2020-21 या शैक्षणिक वर्षातील शालेय शुल्क वसुलीची सक्ती करु नये, असे आदेश देणारे परिपत्रक जारी केले आहे. या पत्रकामुळे अडचणीत सापडेल्या पालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

झारखंड: फी घेतल्यास कारवाई होणार

झारखंडचे शिक्षणमंत्री जगन्नाथ महतो यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आम्ही सर्व शाळांना यावर्षी फी माफ करण्याची अपील केली आहे. आम्ही शाळांची हिटलरशाही चालू देणार नाहीत. या लॉकडाउदरम्यान शाळांनी फी मागितल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...