आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूरकर्मा गजाआड:7 वर्षांत 30 बालकांची रेप करून हत्या, मुलांच्या शोधात 40 किलोमीटर फिरायचा; आता कोर्ट करणार फैसला

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील रोहिणी न्यायालयाने 6 मे रोजी एका 6 वर्षीय मुलीवर रेप करून तिचा खून केल्याप्रकरणी एका व्यक्तीला दोषी ठरवले. आरोपीला 2015 मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अपहरण आणि खून प्रकरणी अटक करण्यात आली होती. आरोपीच्या शिक्षेबाबत न्यायालय आता 20 मे रोजी निकाल देणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंदर असे आरोपीचे नाव आहे. तो सीरियल रेपिस्ट आणि किलर आहे. तो दिल्लीत मजूर म्हणून काम करायचा आणि त्याला अंमली पदार्थांचे व्यसनही आहे. रविंदरने 7 वर्षांत 30 बालकांवर बलात्कार करून त्यांची हत्या केली. त्याने दिल्ली-एनसीआर आणि पश्चिम यूपी भागात सर्वाधिक बलात्कार केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंदरने स्वतः गुन्ह्याची कबुली दिली आहे. 2008 मध्ये उत्तर प्रदेशातील कासगंज येथून दिल्लीत आल्याचे त्याने सांगितले होते. त्यावेळी तो 18 वर्षांचा होता. त्याचे वडील प्लंबर म्हणून काम करायचे, तर त्याची आई लोकांच्या घरात स्वयंपाकी आणि साफसफाईचे काम करायची. दिल्लीत आल्यानंतर त्याला दारू आणि ड्रग्जचे व्यसन लागले. तसेच त्याला पॉर्न व्हिडिओ पाहण्याचेही व्यसन जडले.

त्याने सांगितले की, तो रोज संध्याकाळी दारू प्यायचा किंवा ड्रग्ज घेत असे आणि नंतर त्याचे टार्गेट म्हणजेच अल्पवयीन मुलांच्या शोधात बाहेर पडत असे. त्यासाठी तो एका दिवसात 40 किलोमीटरही चालत असे. सर्वप्रथम त्याने 2008 मध्ये एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. पहिल्यांदा गुन्ह्यात पकडले नाही, तेव्हा त्याची हिंमत वाढली. मग हाच त्याचा दिनक्रम झाला.

मुलांना जवळ बोलावण्यासाठी नोट आणि टॉफीची लालूच द्यायचा

रविंदरने सांगितले की, तो मुलांना जवळ बोलावण्यासाठभ् 10 रुपयांच्या नोटा किंवा टॉफीचे आमिष दाखवत असे. मग तो त्यांना पकडून निर्जन भागात घेऊन जायचा. तेथे तो त्यांच्यावर बलात्कार करून नंतर त्यांची हत्या करायचा. 7 वर्षांत 6 ते 12 वयोगटातील मुलांवर बलात्कार केल्याचे आरोपीने आपल्या जबाबात सांगितले.

पोलिसांनी आरोपीला दोनदा पकडले

रवींद्र कुमारला पोलिसांनी पहिल्यांदा 2014 मध्ये पकडले होते. त्याच्यावर अपहरण, खुनाचा प्रयत्न आणि 6 वर्षांच्या चिमुरडीचे शारीरिक शोषण केल्याचा आरोप होता. मात्र, नंतर त्याची सुटका करण्यात आली. यानंतर, 2015 मध्ये, 6 वर्षांच्या मुलीच्या अपहरणाच्या तपासात पोलिसांनी त्याला अटक केली होती. दिल्लीतील रोहिणी येथील सुखबीर नगर बसस्थानकाजवळ त्याला पकडण्यात आले.

त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी डझनभर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन केले होते. माहिती देणाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंदरवर मुलीचे अपहरण, तिच्यावर बलात्कार आणि नंतर गळा चिरून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर मुलीचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये फेकल्याचाही आरोप त्याच्यावर होता. या प्रकरणात न्यायालयाने त्याला दोषी ठरवले आहे.