आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात वैमानिकाने केलेल्या एका घोषणेमुळे प्रवाशांची हसून पोटे दुखली. या वैमानिकाने शानदार यमक जुळवत आपली घोषणा एका हिंदी कवितेच्या रुपात सादर केली. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात कॅप्टन मजेदार अंदाजात प्रवाशांना विमानात धुम्रपान न करण्याचा सल्ला देताना दिसून येत आहे.
स्पाइसजेटने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेयर केला आहे. त्यात म्हटले आहे - कॅप्टन मोहित यांचा स्वागत संदेश असो किंवा एका आरामदायी विमान प्रवासाची हमी, आम्ही नेहमीच तुम्हाला काहीतरी चांगले देतो! व्हिडिओत दिसून येते की, कॅप्टन मोहित आपल्या हिंदी अनाउंसमेंटमध्ये प्रवाशांना सुरक्षा, विमानातील सुविधा व सावधगिरी बाळण्याची माहिती देत आहेत.
कॅप्टन मोहित यांची हिंदी कविता जशीच्या तशी...
अब से डेढ़ घंटे में होगा गंतव्य पर प्रस्थान,
तो जरा देकर खुद को आराम और न करें धूम्रपान,
वरना दण्डनीय हो सकता है अंजाम...
अगर ऊंचाई की बात करें तो होगा छत्तीस हजार फीट का मुकाम,
क्योंकि अगर और ऊपर गए तो शायद दिख सकते हैं भगवान
800 किलोमीटर प्रतिघंटे की गति से उड़ेगा यह विमान,
सर्दी बहुत होगी बाहर और शून्य से पैंतालीस डिग्री सेंटीग्रेड होगा तापमान...
अगर मौसम खराब हो तो कुछ देर करें विश्राम,
और कोई भी आवश्यकता हो तो बेझिझक करें विमानकर्मियों को परेशान,
थोड़ा लिमिट में ही करें, वरना बन सकती हैं शैतान...
सभी विमानकर्मियों से गुजारिश है, कृपया बनाए रखिएगा मुस्कान
आप सभी का स्वास्थ्य बनाए रखने के लिए उपलब्ध है जलपान...
आप सहयात्रियों से वार्तालाप करें, शायद रास्ता कटे आसान,
मैं आपसे विदा लूंगा और बातें होंगीं आखिरी चरण के दौरान
तब तक आनंद लीजिएगा, जमीन से ऊपर खूबसूरत होगा आसमान...एंजॉय द फ्लाई।
प्रवाशी म्हणाले - So Cool Yaar
वैमानिकाची उद्घोषणा सुरू असताना अनेकांनी त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. मोहितची अनाउंसमेंट एकूण काही प्रवाशी हसतानाही दिसून येत आहेत. त्यातील एक तरुणी So Cool Yaar असे म्हणताना ऐकू येत आहे.
या विमानातून प्रवास करणारे प्रवाशीही सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ शेयर करत आहेत. एक युजर सोशल मीडियावर म्हणाली -स्पाइसजेटच्या विमानाने दिल्लीहून श्रीनगरला जात होते. विमानाच्या कॅप्टनने आपल्या अनाउंसमेंटमुळे धमाल उडवून दिली. त्यांनी सुरुवात इंग्रजीने केली. पण मी रेकॉर्ड करणे नंतर सुरू केले. माहिती नाही ही एखादी नवी मार्केटिंग ट्रिक होती की स्वतः कॅप्टनने असे केले होते. पण हे खूप जास्त मनोरंजक व प्रेमळ होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.