आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi Sunder Nagari Murder Video Footage । Youth Killed By Three Men By Stabbing

दिल्लीत भररस्त्यात खून, तिघांनी एकाला भोसकले, VIDEO:आधी घेरून मारहाण, नंतर चाकूने सपासप वार; बाजूचे बघतच राहिले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील सुंदर नगरी भागात शनिवारी रात्री एका व्यक्तीची रस्त्यावर चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. मनीष असे मृताचे नाव असून तो सुंदर नगरी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी आलम, बिलाल आणि फैजान यांना संशयाच्या आधारे अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परस्पर वैमनस्यातून ही घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही लोक रस्त्यावर येतात, मनीष दुसऱ्या बाजूने येत आहे. हे लोक अचानक मनीषला पकडतात आणि चापट मारायला लागतात. यानंतर, त्याच्यावर सतत चाकूने वार केले. यादरम्यान दुचाकी आणि खुर्चीवर बसलेले दोघे जण हा संपूर्ण प्रकार पाहत आहेत, मात्र मनीषला वाचवण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. काही लोकही तेथून गेले, पण नुसते बघतच राहिले, कोणीही हस्तक्षेप केला नाही.

आरोपींनी आधी मनीषला मारहाण केली आणि नंतर त्याच्यावर चाकूने वार केले.
आरोपींनी आधी मनीषला मारहाण केली आणि नंतर त्याच्यावर चाकूने वार केले.

काय आहे प्रकरण?

वास्तविक, वर्षभरापूर्वी मनीषचा फोन हिसकावण्यात आला होता. कासिम आणि मोहसीन नावाच्या तरुणांनी गळ्यावर आणि पोटात वार केला होता. पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती. कासिम आणि मोहसीनचे कुटुंबीय मनीषवर खटला मागे घेण्यासाठी सतत दबाव आणत होते.

मनीषला जिवे मारण्याच्या धमक्या

मनीष शनिवारी या खटल्यात हजर होणार होता. खटला मागे न घेतल्यास मनीषची हत्या करू, असे कासिम-मोहसीनच्या कुटुंबीयांनी सांगितले होते. पण मनीषने कोर्टात हजर राहून जबाब नोंदवला. तीन दिवसांनी त्याची घरासमोर हत्या करण्यात आली. सध्या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...