आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा2 दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या एका 2 वर्षीय मुलीचा मृतदेह शेजारच्या व्यक्तीच्या घरात खुंटीला टांगलेल्या दप्तरात आढळल्याची संतापजनक घटना उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडात घडली आहे. आरोपी तरूण मुलीला शोधण्यासाठी तिच्या घरच्यांची मदत करण्याचे नाटक करत होता. यावेळी त्याच्या घरातून दुर्गंध येऊ लागल्याने पीडित कुटुंबाला संशय आला. त्यांनी दरवाजा तोडून घराची झडती घेतली असता निष्पाप मुलीचा मृतदेह हस्तगत झाला.
दुसरीकडे, मृतदेह आढळल्यानंतर आरोपी तरूण पसार झाला. तर मुलीची डेडबॉडी आढळल्यामुळे पीडित कुटुंबावर दुःखाची लाट पसरली आहे. सूरजपूर पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, एका कारखान्यात नोकरी करणारे शिवकुमार आपली पत्नी मंजू व मानसी (2) व 7 महिन्यांच्या आदर्शसह ग्रेटर नोएडातील देवळा गावात भाड्याच्या खोलीत राहत होते.
गत 7 एप्रिल ते ड्यूटीवर गेले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी दोन्ही मुलांना घरी सोडून बाजारला गेली होती. परत आल्यानंतर त्यांना मुलगी संशयास्पद स्थितीत गायब झाल्याचे आढळले. त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. पण तिची कोणतीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे रात्री 11 च्या सुमारास आई-वडिलांनी सूरजपूर पोलिस चौकीत जाऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतरही बेपत्ता मुलगी सापडली नाही.
आरोपीचे मुलगी शोधण्याचे नाटक
मानसीचे वडील शिव कुमार यांनी सांगितले की, रविवारी दुपारी शेजारी राहणाऱ्या राघवेंद्र नामक तरुणाच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे आढळले. तिथे जाऊन पाहिले असता घराला बाहेरून कुलूप लावलेले आढळले. तेव्हा राघवेंद्र 2 दिवसांपासून पीडित कुटुंबीयांसोबत मुलीला शोधण्याचे नाटक करत होता. पण त्याच्याच घरातून दुर्गंध येत असल्याचे समजताच तो गायब झाला. त्याची माहिती तत्काळ सूरजपूर पोलिसांना देण्यात आली.
स्कूलबॅगमध्ये आढळला मृतदेह
पोलिसांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर जे काही दिसले ते पाहून त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. 2 वर्षीय मानसीचा मृतदेह पाठीवरील स्कूलबॅगमध्ये खुंटीला टांगून ठेवण्यात आला होता.
नोएडाचे अॅडिश्नल डीसीपी राजीव दीक्षित यांनी रविवारी मुलीचा मृतदेह आढळल्याची पुष्टी केली. सायंकाळी उशिरा आलेल्या शवविच्छेदन अहवालात तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी प्रथम लैंगिक शोषण झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याची पुष्टी झाली नाही. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे. त्याच्या अटकेनंतर हत्येच्या कारणांचा खुलासा होईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.